घरताज्या घडामोडीहिरेन मृत्यूप्रकरण: कोणालाही अशापद्धतीने आयुष्यातून उठवू नका - धनंजय गावडे

हिरेन मृत्यूप्रकरण: कोणालाही अशापद्धतीने आयुष्यातून उठवू नका – धनंजय गावडे

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी सध्या एनआयए (NIA) तपास करत आहे. याप्रकरणाला हिरेन यांच्या मृत्यूनंतर एक वेगळंच वळणं मिळलं आहे. हिरेन यांच्या संशयित मृत्यूप्रकरणात वारंवार चौकशी अधिकारी सचिन वाझे आणि नगरसेवक धनंजय गावडे याचं नाव समोर येत आहे. कारण हिरेन यांच्या मृत्यू अगोदरचं शेवटचं लोकेशन धनंजय गावडे यांच्या जवळ होते, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे याप्रकरणातील संशयाची सुई धनंजय गावडे आणि सचिन वाझे यांच्या भोवती फिरत आहे. जरी सचिन वाझे यासंदर्भातील प्रश्नांना टाळटाळ करत असले तरी धनंजय गावडे यांनी याप्रकरणाबाबत एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात माझा काहीही संबंध नाही आहे, असे गावडे यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की धनंजय गावडे काय म्हणाले?

‘मनसुख हिरेन प्रकरणात माझं नाव येत आहेत, हे माझ्या आश्चर्यकारक आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याप्रकरणात धनंजय गावडे यांना सचिन वाझे नावाचे अधिकारी मदत करतायत, त्याला वाचवण्यात प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणत आहेत. पण यासंदर्भातील कोणतेही पुराव्यास त्यांनी नकार दिला असल्यामुळे त्यांनी फक्त शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे याप्रकरणाशी माझा दूर आणि लांबून कोणताही संबंध नाही आहे,’ असं धनंजय गावडे म्हणाले.

- Advertisement -

तसेच पुढे गावडे म्हणाले की, ‘एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशाप्रकारे बोलावं, याचं मला वाईट वाटत आहे. याप्रकरणात देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा एनआयए उतरली आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि पोलीस विश्वासार्ह एसआयटी देखील तपास करत आहे. त्यामुळे त्यातून खरं बाहेर येईल. निव्वळ कुठे तरी मनसुख हिरेन यांचं लोकेशन वसईत सापडलं म्हणून त्याच्यात माझं नाव घेणं हे कोणत्या तरी बिल्डर लॉबीला पाठीशी घालण्यासारखं आहे. मला सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिलेला आहे. मला आतापर्यंत झालेल्या ट्रायलमध्ये कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत आणि कोणत्याही कोर्टाने दोषी देखील ठरवलेलं नाही. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती अशापद्धतीने बदनामीकारक वृत्त करू नये. पुरावे असतील तर बोला आणि ते तपास यंत्रणेला द्या. कोणालाही अशापद्धतीने आयुष्यातून उठवू नका.’

‘एका बिल्डरला वाचवण्यासाठी प्रतिष्ठाचा वापर केला जात आहे, तो करून नका. पण ठीक हा एक राजकारणाचा भाग आहे. कोणत्या बिल्डरला वाचवतायत हे मी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलं आहे. त्यामुळे आता योग्य वेळेला गोष्टी समोर येतील. आज २०१७च्या गुन्ह्याचा संदर्भ देण्यात आला. त्या गुन्ह्यात मी कधी आरोपी नव्हता. ज्यांनी आरोप केलेत त्यांना जर कागदपत्र हवे असतील तर मी त्यांना ते देतो. त्या गुन्ह्याचा माझाशी काहीही संबंध नाही, याचा तपासचा अहवाल माननीय सत्र न्यायालयात दाखल केला आहे. त्याच्या चारशीट फायइल केल्या असून त्या चारशीटमध्ये माझं नाव नाही आहे. त्यामुळे वडाच साल पिंपळाला लावून कोणाला तरी बदनाम करायचं आणि कोणत्यातरी बिल्डरला वाचवण्यासाठी हे करायचं, या गोष्टी थांबल्या पाहिजे. देशातील सर्वोच्च यंत्रणा या गोष्टींचा तपास करतेय,’ असं धनंजय गावडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Exclusive : विमल हिरेन यांनी केलेल्या तक्रारीची FIR कॉपी, वाचा, काय आहे नेमकी तक्रार ?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -