Homeमहाराष्ट्रDhananjay Munde : अंजली बदनामीया म्हणत धनंजय मुंडेंचा संताप, घोटाळ्याच्या आरोपावरही भाष्य

Dhananjay Munde : अंजली बदनामीया म्हणत धनंजय मुंडेंचा संताप, घोटाळ्याच्या आरोपावरही भाष्य

Subscribe

अंजली दमानिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी अंजली बदनामीया म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपा आमदार संतोष देशमुख यांच्यासह विरोधी पक्षानी केली आहे. याप्रकरणी आता अंजली दमानिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी अंजली बदनामीया म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Dhananjay Munde anger over Anjali Damania serious allegations)

धनंजय मुंडे म्हणाले की, अंजली दमानिया यांना परत राजकारणात यायचं असेल त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पण यासाठी त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करू नये. अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. मी त्यांना सांगू इच्छितो की, परळी औष्णिक केंद्रात जी राख तयार होते, ती त्यांनी स्वत:च्या खर्चाने काढावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. माझ्या कंपनीत पत्नीला दिलेले पद शासकीय आहे का? ही कंपनी 2006 पासून अस्तित्वात आहे. या राखेमुळे बीड जिल्ह्यात सिमेंट इंडस्ट्री आली. पूर्वी राख बॅगमध्ये राहत नव्हती तेव्हा राखेची तळी असायची. आमच्या परळीत अशी दोन-चार राखेची तळी आहेत. ती साफ करायला नको का? मे महिन्यात एप्रिल महिन्यात परळी परिसर राखेमुळे धुळीत माखलेला दिसतो. ऊर्जा विभागाने म्हणावं, ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे, असे आवाहन मुंडेंनी केले.

हेही वाचा – Dhananjay Munde : दमानियांचे माझ्यावरील आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी, काय म्हणाले मुंडे?

धनंजय मुंडे म्हणाले की, मीडियात यायचं आणि स्वत:चा प्रभाव निर्माण करणे अवघड नाही. पाच वर्ष मी विरोधी पक्षात होतो. पण आता बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवणे गरजेचे आहे. वादावर वाद नको म्हणून मी गप्प बसतो. पण एक विषय झाला की, दुसरा विषय. काय करायच याचं? अंजली बदनामीया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्याने कुणी दिले असेल त्यांना आणि दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. परंतु साप साप म्हणून भूई थोपाटणे, मीडियातून सनसनाटी निर्माण करणे आणि एखाद्याचे राजकीय व सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपे नसते, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

हेही वाचा – Dhananjay Munde : दमानियांची पत्रकार परिषद संपताच धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला; काय निर्णय घेणार