Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रAjay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे - अजय मुंडे

Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे – अजय मुंडे

Subscribe

बीड : काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून झालेल्या घडामोडींनंतर आणि संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील काही फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता याच प्रकरणात सातत्याने आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस हेदेखील आता चर्चेत आले आहेत. त्यांच्या जवळचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Dhananjay Munde brother ajay munde criticized Suresh Dhas on khokya bhai arrest)

हेही वाचा :  Jayant Patil : ‘माझे मन लागत नाही, हे जयंत पाटलांनी नागपुरात बोलून दाखवलेले,’ हसन मुश्रीफांचा मोठा दावा

बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासले असतानाच सतीश भोसलेने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ढाकणे कुटुंबातील दोघांना मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. या सर्व आरोपानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तो प्रयागराजला पळून गेला होता. अखेर त्याला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच त्याला बीडमध्ये आणले जाणार आहे. अशामध्ये धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी ट्विट करत, “खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे,” असे म्हणत नाव न घेता सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता आमदार सुरेश धस काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधीही अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली होती. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर हल्लाबोल केला होता. यावरून धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे यांनी सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. तसेच, अजय मुंडे यांनी, ‘खोक्या प्रकरणात सुरेश धसांना सहआरोपी करा,’ अशी मागणी केली होती. यावर आमदार सुरेश धस यांनी पलटवार करताना, ‘अजय मुंडे अजून लहान आहे. धनंजय मुंडेंनी याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावे, खोका-बोका-चोखा सगळे सापडतील,’ असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजय मुंडेंनी सुरेश धस यांना डिवचले आहे.