बीडवर काय लिहावं, काय बोलावं याचा पंकजाने विचार करावा, धनंजय मुंडेंचा पलटवार

scholarships scheduled caste students online attendance dhananjay munde

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी केलेल्या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील बांधकाम विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कारभार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळला असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे, असा सवाल करत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. परंतु पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेनी पलटवार केला आहे.

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी स्वसंरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रिव्हॉल्वरची मागणी केली. या मागणीमुळे पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी अशा पद्धतीची घटना समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी ब्रेकिंग केल्यानंतर सत्ता पक्षाच्या विरोधात एखादी संधी मिळाली तर, ती संधी घेऊन त्या ठिकाणी बोलले जाते. पण यामुळे जिल्ह्याची बदनामी होते, अशावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपण ज्या भूमीत जन्मला आलो त्या भूमीच्या बाबतीत काय लिहावे काय बोलावे या बाबतीत विचार केला पाहिजे, असा टोला पंकजा मुंडेंना लगावला आहे.

ही बीड जिल्ह्याची बदनामी

ज्या अधिकाऱ्याला कार्यरत होऊन १५ दिवसही जात नाही. त्या अधिकाऱ्याला स्वत;च्या जिवाची काळजी वाटते. तसेच अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारच्या बिलावरही सही केलेली नाहीये. परंतु जो अधिकारी पंधरा दिवसांपूर्वी ज्यॉईन झाला आणि पंधराच दिवसांमध्ये त्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. त्यामुळे ही बीड जिल्ह्याची बदनामी आहे. मात्र, ही बदनामी कोणीही सहन करणार नाही. जर अशा पद्धतीने अशा अधिकाऱ्याला कोणीही काहीही करत असेल तर ते सुद्धाही आम्ही खपवून घेणार नाही. अधिकाऱ्याच्या मागे आम्ही सरकार म्हणून खंबीरपणे उभे आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंचा पलटवार…

दरम्यान, बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली,किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव आणि सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे. यांची वैधानिक दखल घ्यावी, अशा प्रकारचं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यावर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता असे म्हणाले की, ज्याला त्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. व्यक्त होणे हे यांसंदर्भातील अधिकार आहेत. ते संविधानाने दिलेले आहेत. मात्र, अशा पद्धतीची घटना समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी ब्रेकिंग केल्यानंतर सत्ता पक्षाच्या विरोधात एखादी संधी मिळाली तर, ती संधी घेऊन त्या ठिकाणी बोलले जाते. पण यामुळे जिल्ह्याची बदनामी होते, अशावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपण ज्या भूमीत जन्मला आलो त्या भूमीच्या बाबतीत काय लिहावे काय बोलावे या बाबतीत विचार केला पाहिजे. असा टोला पंकजा मुंडेंना लगावला आहे.


हेही वाचा : Ind Vs Sa : मयांक अग्रवालच्या खेळपट्टीवर सुनील गावस्करांची नाराजी, भारतीय खेळाडूंना दिला सल्ला