Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंकजाताई काळजी घ्या कोरोनाच्या त्रासाची मला जाणीव, धनंजय मुंडेंकडून पुन्हा काळजी घेण्याचे...

पंकजाताई काळजी घ्या कोरोनाच्या त्रासाची मला जाणीव, धनंजय मुंडेंकडून पुन्हा काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनाची लागण झाल्याची पंकजा मुंडेंनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत आहे. पंकजा मुंडेंनी यापूर्वीही स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. दरम्यान आता पंकजा मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे त्यांना पुन्हा होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरु असून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. यानंतर त्यांचे बंधू व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंकजाताई काळजी घ्या, प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकर बऱ्या व्हाल अशी भावनिक व काळजी घेण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी नेते समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच धनंजय मुंडे यांन पुन्हा ट्विट करत काळजी घ्या असे म्हटले. यापूर्वीही धनंजय मुंडे यांनी पंकजांना काळजी घेण्यास सांगितले होते. आज धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की, पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई. अशा आशयाची फेसबुक पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने…

Posted by Dhananjay Munde on Wednesday, April 28, 2021

कोरोनाची लागण झाल्याची पंकजा मुंडेंनी दिली माहिती

- Advertisement -

माझा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सावधगिरी म्हणून स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या होत्या, कदाचित तेव्हाच कोरोनाची लागण झाली असावी. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी तसेच आपली काळजी घ्यावी असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : भाजप नेत्या पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह, ४ दिवसांपासून होम क्वारंटाईन


 

- Advertisement -