Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रDhananjay Munde: मी-ताई, फडणवीस-दादा... 'एकनाथां'मुळे सगळे 'एकसाथ'; धनंजय मुंडेंकडून कौतुक

Dhananjay Munde: मी-ताई, फडणवीस-दादा… ‘एकनाथां’मुळे सगळे ‘एकसाथ’; धनंजय मुंडेंकडून कौतुक

Subscribe

आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? ते आकर्षण हेच की व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहोत. दादा (अजित पवार) अन देवेंद्र भाऊ एकत्र आहेत.असं सगळं पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एक नाथ आहात, एकनाथांमुळं एकी निर्माण होतेय, असे कौतुकोद्गार राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.

बीड: आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? ते आकर्षण हेच की व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहोत. दादा (अजित पवार) अन देवेंद्र भाऊ एकत्र आहेत. बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र येतात. भैय्यासाहेब आणि लक्ष्मण अण्णा एकत्र आहोत. असं सगळं पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एक नाथ आहात, एकनाथांमुळं एकी निर्माण होतेय, असे कौतुकोद्गार राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. (Dhananjay Munde Me Pankaja Munde Devendra Fadnavis Ajit pawar all together because of Eknath Shinde Appreciation from Dhananjay Munde)

धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनामध्ये अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी या निमित्तानं पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे की व्यासपीठावर एवढी मोठी संख्या असणाऱ्या कुठल्याही वक्त्याला बोलावं असं वाटेल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बीड जिल्हा विकसित म्हणून ओळखला जाईल

मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी 1400 कोटी रुपये दिले त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि आज या बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून या भागाचा आमदार म्हणून आणि आपण दिलेल्या कृषी विभागाच्या आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून एक विश्वास देतो आज ज्या पद्धतीनं ताकदीनं आपण बीड जिल्ह्याच्या पाठीमागं आणि बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा याठिकाणी देताय थोडेसे आणखीन हात ढिल्ले करा हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही हा बीड ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. तर हा बीड जिल्हा सर्वांत विकसित जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं काम केलेला जिल्हा म्हणून याठिकाणी ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं (पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे) मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू, असं धनंजय मुंडे म्हणाले.

श्री क्षेत्र परळी वैजनाथाचा विकास

शिवपुराणाप्रमाणे काशी विश्वेश्वरापेक्षा पुण्य जर कुठं असेल तर या पंचम परळीच्या वैजनाथाला आहे. आज केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. तिथं प्रसाद योजनेच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा याचा प्रस्ताव राज्यशासनाने केंद्राकडं पाठवावा ही हात जोडून प्रभू वैजनाथाच्या साक्षीनं आपल्याला प्रार्थना करत आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी श्री क्षेत्र परळी वैजनाथाचा विकास करण्याची मागणी केली.

(हेही वाचा: Congress Vs BJP : मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर; नाना पटोलेंचा हल्लाबोल )