मुंडेंकडून विधानसभा अध्यक्षांच्या नावाचा चुकीचा उल्लेख, सर्वच अचंबित

भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे त्यांची विधानसभा अध्यपदी निवडकरण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे नार्वेकरांचा अभिनंदन प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्षांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला.

Dhananjay Munde mistakenly mentioned the name of the Speaker of the Assembly

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला अध्यक्षांच्या निवडीने सुरुवात झाली. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे त्यांची विधानसभा अध्यपदी निवडकरण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे नार्वेकरांचा अभिनंदन प्रस्ताव वाचत होते तेव्हा यांच्याकडून अनावधानाने राहुल नार्वेकर यांच्या ऐवजी अध्यक्ष म्हणून शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

अध्यक्षांच्या नावाचा चुकीचा उल्लेख –

राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बोलायला उभे राहिले. मात्र त्यांनी पहिलच वाक्य उच्चरलं आणि समोरच्या बाकावरचे सदस्य ओरडायला लागले. सन्मानीय मिलींद नार्वेकर साहेबांच्या… एवढंच बोलले तोवर समोरच्या बाकावरच्या सदस्यांनी राहुल राहुल..असे आवाज करत विधानसभा अध्यक्ष हे मिलिंद नार्वेकर झाले नाहीत तर राहुल नार्वेकर झाले आहेत. हे धनंजय मुंडेंच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर ही चूक रेकॉर्डवरून काढण्यात आल्याचे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण –

यावेेळी आता विधानसभा अध्यक्षांच्या नावातच गफलत झाली आहे हे लक्षात आल्यावर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी धनंजय मुंडे फडणवीसांकडे गेलो होतो. त्यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर तिथे होते, असे मला कळाले. त्यामुळे माझा अध्यक्षांचे नाव घेताना गोंधळ झाला असल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले. त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन करण्यासाठी कुणी समोरच्या दाराने आले तर कोणी मागच्या दाराने आले असे म्हणत मुंडेंनी शिवसेनेला टोला लगावला.