Homeताज्या घडामोडीDhananjay Munde : 53 दिवसांपासून मीडिया ट्रायलने मला टार्गेट केलं, पण मी......

Dhananjay Munde : 53 दिवसांपासून मीडिया ट्रायलने मला टार्गेट केलं, पण मी… – धनंजय मुंडे

Subscribe

मीडिया ट्रायलसाठी मला मागील 53 दिवसांपासून सातत्याने टार्गेट केलं जात आहे. मागच्या या दिवसांत मी एकही शब्द मीडियामध्ये त्याप्रकारे बोललो नाही. त्यामुळे संकट 53 दिवसांचं होतं, असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर दर्शन घेतलं.

मुंबई : मीडिया ट्रायलसाठी मला मागील 53 दिवसांपासून सातत्याने टार्गेट केलं जात आहे. मागच्या या दिवसांत मी एकही शब्द मीडियामध्ये त्याप्रकारे बोललो नाही. त्यामुळे संकट 53 दिवसांचं होतं, असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संपूर्ण बीड प्रकरणावर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं. (Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case at Bhagvan Gad)

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

“माझ्यावरचं संकट आज आलेलं नाही. मागील 53 दिवसांपासून माझ्यावर संकट कायम आहे. आज 53 वा दिवस आहे. मीडिया ट्रायलसाठी मला मागील 53 दिवसांपासून सातत्याने टार्गेट केलं जात आहे. आणि मागच्या या दिवसांत मी एकही शब्द बोललो नाही. त्यामुळे संकट 53 दिवसांचं होतं. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी मी या भगवान गडावर येऊ शकलो असतो. पण मी आज त्या भावनेनं न येता मंत्री झालो आहे, त्या भावनेनं दर्शन घेण्यासाठी आलो आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

‘संतोष देशमुखांच्या आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे’

“स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येत जे कोणी आरोपी असतील, त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. संतोष देशमुख यांची केस फास्ट ट्रॅकवर आणली पाहिजे. यामध्ये कोणीही असो, कोणालाच सोडून नये त्याला शासन झालंच पाहिजे, ही पहिल्या दिवसापासून माझी भूमिका आहे. आता ही भूमिका मी स्वत:हून मांडल्यानंतरही काही जण राजकारण करत असतील. त्यात माझा राजीनामा घेण्याची मागणी करत असतील. तसेच ज्यांन कोणी संतोष देशमुखांची हत्या केली त्याला फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे. अशात माझा राजीनामा घेऊन माझ्यावर आणि एका समाजावर टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार आहे. पण माझं थेट म्हणणं आहे की, जो कोणी आरोपी आहे, त्याला फासावर लटकवलं पाहिजे”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

भगवानगड संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा – धनंजय मुंडे

“मी भगवान गडावर काल (30 जानेवारी) आलो होतो. माझं काल रात्री चांगलं दर्शन झालं. आजही पुजा करत दर्शन घेतलं. आज (31 जानेवारी) मी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. भगवान गड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी उभा आहे. या गडासारखी शक्ती आणि ताकद त्यात बाबा नामदेवशास्त्री यांचा विश्वास मला मिळणं म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे. कारण भगवानगड हा प्रत्येक गरीबाच्या एक-एक रुपयातून मोठा झाला आहे. म्हणूनच संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हटलं जातं. अशात हा भगवानगड संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे. तसेच, या शक्तीचं वर्णन मी इथे सांगू शकत नाही”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Manoj jarange : ‘मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही’, नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले, “असे महंत…”