घरताज्या घडामोडीकुणी काय बोलावं.., वंशवादावरील मुंडेंच्या भाष्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

कुणी काय बोलावं.., वंशवादावरील मुंडेंच्या भाष्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे, अशा प्रकारचं भाष्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, अशी प्रतिक्रिया माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच पक्षाच्या देशाच्या सर्वोत्तम नेत्याच्या बाबतीत असं बोलत असतील तर मी काय बोलावं. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये याबाबतीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करु शकते हे माहिती आहे, असं मुंडे म्हणाले.

- Advertisement -

मुंडेंचा उल्लेख करत पेडणेकरांचा भाजपाला टोला

राज्यातील विविध मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे फडणवीस सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरून शिवसेना आणि विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट केले आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही यावरून भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलंय. माझ्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा, असं देखील त्यांनी आवाहनं केलं आहे.


हेही वाचा : स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला…; मुंडेंचा उल्लेख करत पेडणेकरांचा भाजपाला टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -