Homeमहाराष्ट्रDhananjay Munde : दमानियांचे माझ्यावरील आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी, काय म्हणाले मुंडे?

Dhananjay Munde : दमानियांचे माझ्यावरील आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी, काय म्हणाले मुंडे?

Subscribe

अंजली दमानिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार केला आहे. 92 रूपयांची नॅनो युरियाची बॅग धनंजय मुंडेंनी 220 रूपयांना घेतली, असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.

मुंबई : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपा आमदार संतोष देशमुख यांच्यासह विरोधी पक्षानी केली आहे. याप्रकरणी आता अंजली दमानिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार केला आहे. 92 रूपयांची नॅनो युरियाची बॅग धनंजय मुंडेंनी 220 रूपयांना घेतली, असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. (Dhananjay Munde refutes allegations made by Anjali Damania)

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, अंजली दमानिया यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणे आणि धादांत खोटे बोलण्याव्यतिरिक्त काहीही केलेलं नाही. मागच्या 50 दिवसांपासून अंजली दमानिया माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. पण त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही आरोपींची हत्या झाली, असा आरोप त्यांनी केला होता. असे सनसनाटी आरोप माझ्यावर केले जात आहेत. पण स्वत:ची प्रसिद्धी आणि दुसऱ्याची बदनामी करण्याव्यतिरिक्त यात काही आढळत नाही. आज 58 दिवस झाले असून, माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. हे सर्व कोण चालवत आहे, हे मला माहिती नाही, असे मुंडे म्हणाले.

हेही वाचा – Dhananjay Munde : दमानियांची पत्रकार परिषद संपताच धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला; काय निर्णय घेणार

धनंजय मुंडे म्हणाले की, डीबीटीमध्ये काय पाहिजे आणि काय नाही, तसेच कोणतीही बाब वगळण्याची किंवा त्यामध्ये समाविष्ट करण्याचे अधिकार कृषिमंत्री आणि मुख्यमत्र्यांना असतात. याच कार्यपद्धतीचा अवलंब केला गेल आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून मान्यतेने प्रक्रिया अंतिम करण्यात आली होती. एप्रिल, मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता आणि जूनमध्ये सुरू होणारा खरिप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया मार्च महिन्यात करण्यात आली होती. शेतकऱ्याला पेरणीच्या आधी कोणत्या गोष्टी लागतात, फवारणी कधी करायची, तण कधी काढायचे हे त्यांना माहिती नसावं, असा टोलाही मुंडेंनी अंजली दमानिया यांना लगावला.

बदनाम करण्याच्या एपिसोडमध्ये आता मी

धनंजय मुंडे म्हणाले की, अंजली दमानिया यांनी एक नॅनो खताचा आरोप केला आहे. नॅनो खताच्या बाबतीत सर्वात जास्त प्रोत्साहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. नरेंद्र मोदींच्या प्रोत्साहानंतर महाराष्ट्राने 4 लाख शेतकऱ्यांना नॅनो खत दिले. नॅनो खताची खरेदी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीकडून झाली. यानंतर नॅनो खताची किंमत आजही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. त्यापेक्षा कमी दरात आपण हे खत दिले. नॅनो खतामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होते. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. मात्र, मला बदनाम करण्याचे काम दमानिया करत आहेत. त्यांनी याआधीही अनेकांना बदनाम करण्याचे काम केले आहे. आता या एपिसोडमध्ये मी आहे. त्यामुळे मला काही नवल वाटत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा – Anjali Damania: धनंजय मुंडेंचा कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा; भगवान गडानेच आता राजीनामा मागावा