घरताज्या घडामोडी....तर समीर वानखेडेंच्या प्रकरणाची होईल चौकशी?; धनंजय मुंडेंचे संकेत

….तर समीर वानखेडेंच्या प्रकरणाची होईल चौकशी?; धनंजय मुंडेंचे संकेत

Subscribe

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून शाहरुख खानच्या मुलगासह अनेक आरोपींना अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याचे चिन्ह दिसत आहे. कूझ प्रकरणाच्या सुरुवातीपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी धर्मांतर करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे. तसेच मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय विभागाकडे याप्रकरणी तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यानच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘जर कोणी समीर वानखेडेंच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल आक्षेप नोंदवला तर सामाजिक न्याय विभाग त्याची चौकशी करेल.’

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्या या विधानावर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘समीर वानखेडेंविरोधात राज्य सरकार अजेंडा राबवत असून त्यांच्यावर लक्ष्य केलं जात आहे. समीर वानखेडे ना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ना कोणत्या भाजप नेत्याचे नातेवाईक. मात्र ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करत असलेल्या अधिकाऱ्याविरोधातील सरकारची भूमिका निषेधार्ह आहे.’


हेही वाचा – ड्रग्जमुळे नवाब मलिक कोट्यावधींचे मालक; वानखेडेंच्या वडिलांचा आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -