घरताज्या घडामोडीदेश आर्थिक संकटात मात्र अजितदादांनी महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडू दिली नाही -...

देश आर्थिक संकटात मात्र अजितदादांनी महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडू दिली नाही – धनंजय मुंडे

Subscribe

राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. देशासह जगात कोरोनामुळे आर्थिक संकटही निर्माण झालं आहे. कोरोनाच्या संकटात जगावर आर्थिक संकट आले आहे. देशात आणि महाराष्ट्रातही आर्थिक संकट कोसळले आहे. परंतु या संकटातही महाराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अर्थिक घडी विस्कटली नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच महाराष्ट्रात नंबर १ चा राजकीय पक्ष असे असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. सरकार आले दोन वर्ष झाले आपण संकटात आहोत. कोविडचे संकट आहे. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला ज्या दिवशी मांडला त्याच्या ८ दिवसानंतर लॉकडाऊन झाले. त्यावेळेपासून आजपर्यंत सगळे जग आर्थिक संकटात आहे. देश आर्थिक संकटात आहे. महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे परंतु उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात आर्थिक संकटात सुद्धा आर्थिक घडी या महाराष्ट्राची बिघडू दिली नाही. त्याला शिस्तच लागते आणि इथे शिस्तीशिवाय दुसरे काही नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी क्रमांक १ चा पक्ष

केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्या केंद्रातील सरकारला आणि भाजपला म्हणायचे आहे अजित पवारांच्या मागे ईडी लावली, सीबीआय लावलं, आयटी लावलं काहीही ठेवलं नाही आणि काही सापडले नाही. त्या ईडीची चव एवढी घालवू नका आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरीसुद्धा बीडी खिशात ठेवतो त्याची सुद्धा किंमत जास्त आहे. यांनी किती प्रयत्न केला. वडगाव मावळमधून भाजप पार साफ करुन टाकली. येणाऱ्या निवडणुकीत मी विश्वास देतो ज्या कोणत्या निवडणुका होतील शरद पवारांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात १ नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -