घरताज्या घडामोडीपंकजा मुंडेंनी पाच वर्षे मंत्रीपद भाड्याने दिले होते का ? ऊसतोड महामंडळावरून...

पंकजा मुंडेंनी पाच वर्षे मंत्रीपद भाड्याने दिले होते का ? ऊसतोड महामंडळावरून धनजंय मुंडेंचा सवाल

Subscribe

पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जोरदार शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी स्वकीयांचे कान टोचण्यापासून धनंजय मुंडे यांनाही टोला लगावला. मंत्रीपद भाड्याने देऊन काही लोक फिरताहेत, अशा कठोर शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली खरी, पण या टिकेला धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. एकुणच विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा सरकार पाडण्यासाठी होणारा वापर या मुद्द्यावरही धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. (Dhananjay munde slams pankaja munde over minister portfolio sugarcane labour corporation )

पंकजा मुंडे याआधीच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षात मंत्री होत्या. पण मंत्रीपद असतानाही ऊसतोड कामगारांसाठी काही करता आले नाही याची खंत आज त्यांनी भगवान गडावरील भाषणात कबुल केली. पंकजा मुंडे मंत्री असताना बीड जिल्ह्यातील उसतोड मजुरांसाठी त्यांना न्याय देता आला नाही, हे त्यांनी आज सांगितले. पंकजा मुंडेंनी त्यावेळी आपले मंत्रीपद किरायाने दिले होते का ? असा सवाल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विचारला. पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते.

- Advertisement -

पंकजा मुंडे यादेखील पालकमंत्री आणि मंत्री म्हणून राहिलेल्या आहेत. त्यामुळे हा मंत्रीपदावर भाष्य करणे हा अतिशय केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहित आहे. दोन वर्षात संकटे असतानाही पालकमंत्री म्हणून मी काय केले हेदेखील जनतेला माहिती आहे. त्यांनी ऊसतोड कामगारांच्या महामंडळाची पायाभरणी केली म्हणून मुद्दा मांडला. पण वारंवार रद्द झालेले महामंडळ हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अस्तित्वात आहे. आमच्या महामंडळाचे त्यांनी कौतुक केले आहे ही चांगली गोष्ट आहे. पण पाया इतका कच्चा होता, त्यामुळे ते महामंडळ वारंवार रद्द झाले, असाही टोला त्यांनी लगावला.

पंकजा मुंडे सत्तेत की विरोधी पक्षात ?

पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील सत्तेवरून स्वकियांनाही टोला लगावला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या सत्ता पक्षात आहेत की, विरोधी पक्षात आहेत ही कोणती तरी भूमिका त्यांनी घ्यावी. त्यांचा पक्ष सरकार पाडण्यासाठी ईडी, आयटी, सीबीआय केंद्राच्या संस्थांचा वापर करत आहे. त्यांच्या पक्षाने या यंत्रणा महाराष्ट्रापुरत्या केल्या आहेत. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षाने वाटेल ते प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे सरकार पडेल या गोंधळात रहायचे, अशा स्थिती सध्या आहे. त्यामुळ पंकजा मुंडे गोंधळात राहू नये असेही धनंजय मुंडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा मंत्रिपद भाड्यावर टाकून फिरतायत; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंची तोफ ठाकरे सरकारवर धडाडली

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -