Corona Update : धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना; ट्विट करत दिली माहिती 

राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Dhananjay Munde takes strategic decisions regarding various demands of theKhatik society

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली. तर दोन दिवस आधीच त्यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती,’ असे धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

तसेच मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे. मुंडे यांना याआधी मागील वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती.