Homeमहाराष्ट्रBeed District : जिल्ह्याची नाहक बदनामी थांबवा, धनंजय मुंडेंची अजित पवारांना गळ

Beed District : जिल्ह्याची नाहक बदनामी थांबवा, धनंजय मुंडेंची अजित पवारांना गळ

Subscribe

पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज प्रथमच बीड दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षेतत आज जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याची नाहक बदनामी थांबवण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे गेली आहे.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली होती. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज प्रथमच बीड दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षेतत आज जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याची नाहक बदनामी थांबवण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे गेली आहे. (Dhananjay Munde urges Ajit Pawar to stop the unjust defamation of Beed district)

धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताना म्हटले की, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून मागील चार वर्षाच्या पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मी त्यांना सांगितले की, बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Waqf Bill : वक्फ विधेयकाला विरोध; फडणवीस म्हणतात, अल्पसंख्याक लांगूलचालनाची परंपरा ठाकरेंनी अंगीकारली 

धनंजय मुंडे म्हणाले की, कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही. त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी-कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील? त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. कारण काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात असून, सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

हेही वाचा – Raj Thackeray : भ्रष्टाचाऱ्यांशी हातमिळवणी करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा