घरताज्या घडामोडीबीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट होणार, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना

बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट होणार, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना

Subscribe

पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची या बॉर्डरवर अँटिजेन टेस्ट करुन त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास द्यावेत

बीड जिल्ह्यात प्रवेश करताना आता नागरिकांना अँटिजेन चाचणी करणं आवश्यक असणार आहे. बीडचा कोरोना पॉझिटिव्हिटि रेट कमी करण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश लेवल ३ मध्ये समावेश करण्यात आला होता. परंतू राज्यातील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. यामुळे ज्या जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. अशा ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. परंतू मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक निर्बंध लागू करण्यास सांगितले आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे या जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. तर राज्यातील ११ जिल्ह्यांचा कोरोना पॉजिटिव्हिटी रेट कमी असल्यामुळे या जिल्ह्यांना लेवल १ मध्ये टाकण्यात येऊन कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतला यावेळी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी काही कडक निर्बंध लागू करुन नागरिकांच्या अँटिजेन चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

बीड जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी व्हावा यासाठी स्थानिक प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. तसेच इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात यावी आणि जिल्ह्यात प्रवेश द्यावा अशा सूचना धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभारा

बीडमधील कोरोना रुग्णांचा शोध आणि कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यातील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर चेक पोस्ट उभारण्या यावेत. पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची या बॉर्डरवर अँटिजेन टेस्ट करुन त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास द्यावे तसेच याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात यावी असे निर्देश धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे

बीड जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील परिस्थितीचा विचार आणि अनुभवातून ऑक्सिजन, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर,औषधे, इंजेक्खशन, वैद्यकीय उपकरणे याची उपलब्धता ठेवण्यात यावी. असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

धनंजय मुंडेंचे थेट राजेश टोपेंना फोन

बीड जिल्ह्याची दिवसाला १ लाख लोकांची लसीकरणाची क्षमता आहे. मात्र आठवड्याला केवळ १० हजार लसींची मात्रा मिळत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना फोन करुन जिल्ह्याला अधिक कोरोना लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी पुढील महिन्यापासून लसींचा तुटवडा भासणार नाही असे आश्वासन दिलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -