मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये आषाढी पूजेसाठी पाय ठेवू देणार नाही, उजनी पाणी प्रश्नावरून धनगर समाज आक्रमक

dhangar community warn cm thackeray not allowed to come in Pandharpur for Ashadi Puja
मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये आषाढी पूजेसाठी पाय ठेवू देणार नाही, उजनी पाणी प्रश्नावरून धनगर समाज आक्रमक

उजनी पाणी प्रश्नावरुन धनगर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऊजनीचे पाणी बारामती लोकसभा मतदारसंघात नेण्यात आले आहेत. याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी दिला आहे. उजनी पाणी प्रश्नावरुन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु धनगर समाजाकडून याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मंत्री भरणे धनगर समाजाचे आहेत यामुळे त्यांना निशाणा करण्यात येत आहे. तसेच जर त्यांन मंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

उजनीच्या पाणी प्रश्नावरन दरवर्षी राजकारण सुरु असते. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळवल्याचा आरोप सोलापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे. उजनीचे पाणी दिल्यामुळे सोलापूरमध्ये तीव्र संघर्ष वाढला आहे. या सगळ्याला पालमकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांना जबाबदार धरण्यात येत आहे. यामुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटाव अशी भूमिका काँग्रेस, भाजपकडून सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडूनही कुरघोड्या करण्यात येत आहेत. राज्यात धनगर समाजाचे कमी आमदार आहेत. या आमदारांना बाहेर काढण्याचा कट रचण्यात येत आहे. जर दत्तात्रय भरणे यांना मंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमध्ये आषाढी वारीदरम्यान महापूजेला येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे.

तसेच पालकमंत्री पदावरुन काढलं तर धनगर समाज बारामतीमध्ये जाऊन आंदोलन करेल. भरणे यांना हटवण्याच्या मागणीला आमचा विरोध असल्याचे धनगर समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांना हटवल्यास आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीला दिला आहे.


हेही वाचा : PHOTO: राणीच्या बागेतील बंगाल टायगरलाही उन्हाची झळ, पाण्यात पोहतानाचे फोटो व्हायरल