घरमहाराष्ट्रधनगर समाजाकडून पुन्हा आमरण उपोषणाचा निर्णय, सरकारविरोधात यशवंत सेना संतापली

धनगर समाजाकडून पुन्हा आमरण उपोषणाचा निर्णय, सरकारविरोधात यशवंत सेना संतापली

Subscribe

एकीकडे मराठा समाजाने राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला असताना आता दुसरीकडे मात्र, धनगर समाजाने सरकारला 50 दिवसांचा कालावधी संपला आहे. याबाबतची माहिती धनगर समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. परंतु, मराठा समाजाप्रमाणेच आता इतर समाजाकडून सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढताना दिसत आहेत. एकीकडे मराठा समाजाने राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी 25 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला असताना आता दुसरीकडे मात्र, धनगर समाजाने सरकारला 50 दिवसांचा कालावधी संपला आहे. याबाबतची माहिती धनगर समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. (Dhangar community’s decision to fast to death again, Yashwant Sena angry against government)

हेही वाचा – मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, पुन्हा दिला सरकारला इशारा

- Advertisement -

धनगर समाजाने याआधी आक्रमक पवित्रा घेत 21 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने 50 दिवसांची मुदत मागून घेत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ही मुदत आता संपली असून धनगर समाजाचे नेते आता पुन्हा उद्यापासून (ता. 16 नोव्हेंबर) चौंडी येथे उपोषणाला बसणार आहेत. याशिवाय धनगर समाजाकडून राज्यभरात 20 ठिकाणी आमरण उपोषणाला आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या या कृतीमुळे धनगर समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारकडून धनगर समाजाची क्रूर थट्टा केली गेली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनगर समाजाचे नेते आणि यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतले यांनी सांगितले की, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उद्यापासून पुन्हा चौंडीत आमरण उपोषण केले जाईल. सरकारला दिलेली 50 दिवसांची मुदत संपली आहे. राज्य सरकारकडून धनगर समाजाची क्रूर थट्टा केली गेली. राज्य सरकारने 21 दिवसांच्या उपोषणानंतर 50 दिवसांचा अवधी मागितला. मात्र काहीच केले नाही. 50 दिवसात आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. सरकारने शब्द देऊनही अद्याप अभ्यास समिती देखील नेमली नाही.

- Advertisement -

त्यामुळे यशवंत सेना उद्या 16 तारखेपासून पुन्हा चौंडीत उपोषण आंदोलन सुरू करणार आहे. राज्यात 20 ठिकाणी आमरण उपोषण आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येईल. तर अंबड येथे ओबीसी मेळावा होत आहे. त्या मेळाव्याकडे धनगर समाज लक्ष ठेऊन आहे. मेळाव्यात धनगर अरक्षणाबाबतबाबत सकारात्मक असेल तरच आम्हाला तुमच्यामध्ये गृहीत धरावे, अशी स्पष्ट भूमिका धनगर समाजाच्या नेत्याकडून घेण्यात आली आहे. तर, धनगर समाजाच्या उपोषणाच्या समर्थनामध्ये उद्या बारामती बंदची घोषणा करण्यात आली आहे. धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली असून धनगर समाजाच्यावतीने तहसीलदारांना तसे निवेदनही देण्यात आले आहे. धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने बारामती बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -