घरताज्या घडामोडीDhanteras 2021 : भारतीयांची ७ हजार ५०० कोटींची सोन्याची खरेदी, सर्वाधिक खरेदी...

Dhanteras 2021 : भारतीयांची ७ हजार ५०० कोटींची सोन्याची खरेदी, सर्वाधिक खरेदी कुठे ?

Subscribe

कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्याच्या खरेदीवर मोठा परिणाम पहायला मिळाला होता. पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा सराफा बाजारात आनंद व्यक्त करण्यात आला आहे. धनतेरसच्या निमित्ताने देशभरातील सराफा बाजारात सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सोन्या चांदीच्या बाजाराला झळाळी आली खरी, पण वाहन विक्रीच्या अनुषंगाने मात्र हा सिझन पुन्हा घसरता आलेख असणाराच आहे. संपुर्ण दशकातील मोठी घसरण यंदा वाहन विक्रीच्या व्यवसायात पहायला मिळाली आहे.

कन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) च्या माहितीनुसार धनतेरसच्या दिवशी देशभरात ७ हजार ५०० कोटींची सोने आणि चांदी खरेदीची उलाढाल झाली. २००१९ च्या महामारीच्या आधीच्या वर्षापेक्षाही यंदा ही खरेदी वाढलेली पहायला मिळाली आहे. जवळपास १५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची विक्री धनतेरसच्या निमित्ताने झाली. याधी २०२० धनतेरसच्या निमित्ताने झालेली सोन्याची उलाढाल ही ३ हजार कोटी ते ५ हजार कोटी होती. तर २०१९ मध्ये सोन्याच्या खरेदीचा आकडा ४ हजार ५०० कोटी इतका होता.

- Advertisement -

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार यंदाच्या दिवाळसणाच्या निमित्ताने वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली नाही. ज्या वेगाने यंदाच्या सिझनला वाहनांची विक्री होणे गरजेचे होते, त्या प्रमाणात ही विक्री झालेली नाही. बाजारात वाहनांसाठी मागणी असूनही त्या प्रमाणात वाहने उपलब्ध नाहीत, हे एक कारण आहे. याचे प्रमुख कारण हे चिप संकट आहे. एमजी मोटरने धनतेरसच्या निमित्ताने मिड साइज एसयूवी एस्टर कारच्या ५०० हून अधिक जास्त गाड्यांची विक्री केली आहे.

यंदाच्या वर्षी सराफा बाजारात आधीच तयारी करण्यात आली होती. जुन्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्याचे आव्हान होते. पण डिझाईनवरही व्यापाऱ्यांचा जोर होता. सोन्याच्या छोट्या रिंगपासून ते अंगठी, नेकलेस, सोन्याची नाणी आणि बांगड्या अशा अनेक डिझाईनसाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली होती. कोरोना लसीकरणानंतर ग्राहकांचा वाढलेला विश्वास पाहता यंदा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे यंदाच्या वर्षी सोन्याचे दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या उलाढालीवर झालेला दिसून आला आहे. यंदाच्या वर्षी धनतेरसला सोन्याचा भाव ४६ हजार ८४४ रूपये होता. गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२० च्या तुलनेत ३ हजार ५८१ रूपये हा भाव कमी होता. गेल्या वर्षी १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांनी ५० हजार ४२५ रूपये मोजले. पण यंदाचा चांदीचा दर मात्र अधिक आहे. यंदा प्रति किलोग्राम ६३ हजार ३३३ रूपये इतका दर चांदीसाठीचा आहे. गेल्या वर्षी हाच चांदीचा दर ६२ हजार ५४२ रूपये इतका होता.

- Advertisement -

कुठे किती सोन्याची विक्री ?

धनतेरसच्या निमित्ताने संपुर्ण देशभरात ७ हजार ५०० कोटी रूपयांच्या सोन्याची खरेदी झाली. जवळपास १५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी भारतीयांनी केली. CAT ने जाहीर केलेल्या माहितीनुसार दिल्लीत १ हजार कोटींची सोन्याची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात १५०० कोटी रूपयांची सोन्याच्या खरेदीची उलाढाल झाली. सर्वाधिक अशी दक्षिण भारतात २ हजार कोटींची उलाढाल झाली. तर युपीत ६०० कोटी रूपयांची सोन्याची खरेदी पार पडली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -