घरमहाराष्ट्रनाशिकअंजनेरी गडावर उभारणार धर्मध्वज; महंतांचा संकल्प

अंजनेरी गडावर उभारणार धर्मध्वज; महंतांचा संकल्प

Subscribe

त्र्यंबकेश्वर : अंजनेरी गड हेच हनुमानाचे जन्मस्थान आहे. ते आता धर्म परिषदेत निश्चित झाले आहे. त्यामुळे अंजनेरी गडावर धर्मध्वज उभारण्याचा संकल्प येथील साधुमहंतांनी विजयी बैठकीत केला.
अंजनेरी गड रस्त्यावर असलेले अशोक बाबांच्या आश्रमात ही बैठक पार पडली. यावेळी अंजनीमाता बाल हनुमान मंदिराचे ब्रह्मगिरीजी महाराज, श्रीराम शक्ती पिठाचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, नाशिकचे महंत भक्ती चरणदास,महंत सुधीर पुजारी यांचा सत्कार झाला.श्री महंत शंकरानंद सरस्वती, महंत उदयगिरी महाराज, महंत पिनाकेश्वर महाराज, स्वामी कंठानंद यांचे स्वागत करण्यात आले.अंजनेरीचे गणेश चव्हाण, राजाराम चव्हाण व सहकारी यांचे हस्ते हा सत्कार करण्यात आला.अंजनेरी हे जन्मस्थान हनुमानाचे जन्मस्थान असतानाही गालबोट लावण्याच्या हेतूने गोविंदानंद सरस्वती जिल्ह्यात आले होते असा आरोप सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला. हनुमान भक्ताच्या एकिमुळे त्यांना परतावे लागले असे ते म्हणाले.अंजनी गडाचा ,टोकावरचा, मधला टप्पा असा समतोल विकास झाला पाहिजे. अंजनेरी पंचक्रोशी यांच्यात एकी टिकवा अशी मोलाची चर्चा झाली.बदादे ,कडाळी ,लांडे, चव्हाण बंधू उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -