घर देश-विदेश बागेश्वर महाराजांचे साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; म्हणाले...

बागेश्वर महाराजांचे साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; म्हणाले…

Subscribe

 

नवी दिल्लीः साईबाबा हे संत असू शकतात. फकीर असू शकतात. पण ते देव नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागावी अशी मागणी शिर्डी संस्थांनाने केली आहे.

- Advertisement -

साईबाबांची पुजा वैदिक पद्धतीने का होते, असा प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावर संतापजनक उत्तर त्यांनी दिले. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक सनातनी हिंदूंचे कर्तव्य आहे. शंकराचार्य यांनी साईबाबांना कधीच देवाचे स्थान दिले नाही. साईबाबा हे संत असू शकतात. फकीर असू शकतात. पण ते देव नाहीत, असे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत.

याआधी धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसता, असं देखील बागेश्वर म्हणाले होते.

- Advertisement -

धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबई भेटीत सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी पोलिसांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. हा मुद्दा शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता. धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नाकारणे हा घातपात असू शकतो. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सरवणकर यांनी विधिमंडळात केली होती. याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.

- Advertisment -