पुणे : मागील वर्षभरापासून चर्चेत असलेले धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा सत्संग छत्रपती संभाजीनगरनंतर आता पुण्यात सुरू असून, तीन दिवस चालणाऱ्या ‘हनुमान सत्संग कथा’ व ‘दिव्य दरबारामधील पहिल्याच दिवशी धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कारणे सांगू नका, आता दरबारात या आणि म्हणणे मांडा अशा शब्दांत खुले आव्हान दिले आहे. (Dhirendra Shastris open challenge to Annis Do not give reasons come to the court and present your opinion)
पुण्यातील जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे संगमवाडी येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या तीन दिवसीय ‘हनुमान सत्संग कथा’ व ‘दिव्य दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांचे आक्षेप असतील, तर त्यांनी दरबारात येऊन मांडावे. माझ्यावर परमेश्वराची कृपा असल्याने मी स्पष्ट बोलतो, त्यासाठी कारणे सांगू नका असे थेट आव्हानच त्यांनी अंनिसला दिले आहे.
हेही वाचा : ‘मला तो पॅट कमिन्स बिल्कूल नाही आवडत…’; राष्ट्रवादीच्या आमदाराची मुलगी ओक्साबोक्शी रडली
अंनिसने केला होता विरोध
मागील काही महिन्यांपूर्वी धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा दिव्य दरबार नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना विरोध केला होता. त्यावेळी देशभर गदारोळ माजला होता. तर श्याम मानव यांनी महाराष्ट्रात येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. यावेळी श्याम मानव यांनी बागेश्वर धाम सरकार यांचे दावे घटनाविरोधी, अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती.
हेही वाचा : IND vs AUS : दोन सामने गमावल्यानंतर योग्य नियोजन, भारतीय फलंदाजांचा अभ्यास अन् ऑस्ट्रेलियाने…
धीरेंद्र शास्त्रींकडून अंनिसला प्रत्युत्तर
अंनिसने केलेल्या विरोधाला धीरेंद्र शास्त्री यांनी सोमवारी (20 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, सनातन हिंदू संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दरबार भरवतो. तर मी कधीही रावणाशी फोनवर बोललेलो नाही. विनोदाच्या माध्यमातून भाविकांना संस्कृती समजावून सांगण्याचा प्रयत्न होता. मंत्रविज्ञान व मंत्रचिकित्सेचा पुरस्कार करत असलो, तरी रुग्णालयांना माझा विरोध नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांचे आक्षेप असतील, तर त्यांनी दरबारात येऊन मांडावे. माझ्यावर परमेश्वराची कृपा असल्याने मी स्पष्ट बोलतो, त्यासाठी बहाणे सांगू नका,’ अशा शब्दांत त्यांनी अंनिसला प्रत्युत्तर दिले आहे.