T20 World cup : धोनीचा मिडास टच भारतीय संघासाठी लकी ठरेल – फारूख इंजिनिअर

jadeja question BCCi on chosen Dhoni as a mentored

युएई आणि ओमान येथे होणाऱ्या टी २० वर्ल्ड कपच्या निमित्ताने बीसीसीआयने एम एस धोनीची भारतीय संघाचे मेंटॉर म्हणून नेमणूक करून एक सरप्राईज दिले होते. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऑगस्ट २०२० मधील निवृत्तीनंतर पहिल्यांदाच भारतीय संघासोबत नव्या जबाबदारीत धोनी टीमसोबत दिसणार आहे. धोनी भारतीय संघासोबत याआधी २०१९ च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये दिसला होता. धोनीच्या नेमणूकीमुळे मोठ्या घडामोडी घडणार यासाठीच्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यातच रवी शास्त्री यांचे भारतीय संघासोबतचे कंत्राट टी २० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. तर राहुल द्रविडला भारतीय संघाचा कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. शास्त्रीनंतर धोनीची नेमणूक होणार का ? यासाठीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फारूक इंजिनिअर यांनी आता धोनीच्या मेंटॉर म्हणून म्हणून निवडीबाबत विधान केले आहे. येत्या टी २० वर्ल्ड कपनंतर धोनीकडे आणखी महत्वाची जबाबदारी येईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. धोनी हा एकमेव कॅप्टन आहे, ज्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व महत्वाच्या अशा जागतिक पातळीवरी आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारतीय संघासाठी आवश्यक असलेले नशीब धोनीच्या निमित्ताने नक्कीच परत मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

धोनीला या जबाबदारीत पाहताना थोडेसे आश्चर्यच वाटले. पण या जबाबदारीत धोनी का दिसू नये ? असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. धोनीकडे नेहमीच आणि आताही मिडास टच आहे. धोनीने ज्या गोष्टीला स्पर्श केला त्या गोष्टीचे सोनं झाले. धोनीच्या बुद्धीमत्तेने आणखी यश आणि नशीब भारतीय संघाला लाभेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. धोनी हा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आहे. त्यामुळे धोनीचा ड्रेसिंग रूममधील वावर हा खेळाडूंनाही सकारात्मक ऊर्जा देणारा असा असेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही संघाला मेंटॉर असणे हे मानाचे स्थान असते. ज्या पद्धतीने सचिन तेंडूलकर मुंबई इंडियन्ससाठी मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळतो ही गौरवाची गोष्ट असल्याचे फारूक इंजिनिअर म्हणाले. त्यामुळे धोनी, सचिनसारखे खेळाडू सभोवताली असणे ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. खेळाडूंनी एकदा खेळासाठी समर्पित केले की लोक आपल्याला विसरून जातात, असेही ते म्हणाले.

पण आता क्रिकेटप्रेमी हेदेखील सक्रीय आहेत. जर तुम्ही गुणी आणि आकर्षक खेळाडू असाल तर फॅन्सही तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवतात. धोनी आणि शास्त्री हे भारतीय संघासोबत आहेत. त्यामुळेच धोनीची जबाबदारी ही भारतीय संघासाठी नक्कीच शास्त्रींपेक्षा वेगळी असेल असेही त्यांनी सांगितले. धोनीचा अनुभव, संयमी स्वभाव यामुळेच धोनीच्या निवडीचा निर्णय झाल्याचे ते म्हणाले. प्रत्येक खेळाडू हा कोच होऊ शकत नाही. त्यामुळेच धोनीची निवड करून बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. धोनी कधीच कुणाच्या कामात किंवा कुणासोबतही ढवळाढवळ करत नाही. जर एखादी गोष्टी चांगल्या पद्धतीने केली जाणे शक्य असल्यास धोनी नक्कीच त्या गोष्टीबाबत सल्ला देतो असेही ते म्हणाले. म्हणूनच विराट आणि टीमला तसेच रवी शास्त्रीला त्याच चातुर्याने तो सूचना करेल असा विश्वास आहे.


हेही वाचा – ICC T20I WORLD CUP : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा