घरमहाराष्ट्रधुळे मारहाण प्रकरण; आणखी एक अटकेत

धुळे मारहाण प्रकरण; आणखी एक अटकेत

Subscribe

धुळे मारहाण प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. दशरथ पिंपळसे असे या आरोपीचे नाव असून या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

धुळ्यातील राईनपाडा येथे पाच जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दशरथ पिंपळसे असे या आरोपीचे नाव असून या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप १५ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती धुळ्याचे पोलीस अधिक्षक एस. रामकुमार यांनी दिली आहे. मारहाण प्रकरणानंतर ५ जुलै रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी महारू पवारला अटक केली होती. मारहाण करताना महारू पवारने जमावाचे नेतृत्व केले होते. १ जुलैला धुळ्यातील राईनपाडा येथे ५ जणांची जमावाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर तात्काळ कारवाई करत २३ जणांना अटक करण्यात आली होती. आत्तापर्यंत एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

रविवार दिनांक १ जुलैचा दिवस! धुळ्यातील राईनपाडा गावात ५ लोक गावातील बाजाराच्या ठिकाणी उतरले. यावेळी एकजण लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ही बहुधा लहान मुले पळवणारी टोळी असावी असा गावातील लोकांचा समज झाला. ही अफवा संपूर्ण बाजारात पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यापैकी जवळपास ३५ जणांनी मिळून ५ जणांना बेदम मारहाण केली. मारहाण करताना १२ जण राईनपाडा गावातील होते. पाच जणांना झालेली मारहाण इतकी क्रूर आणि अमानुष होती की या मारहाणीमध्ये ५ जणांचा जागीच जीव गेला. सोशल मीडियावरून मारहाणीचा व्हि़डिओ समोर आला. त्यामुळे या प्रकरणाला तोंड फुटले. व्हिडीओमध्ये पहिल्यांदा काही लोक चपलीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही तरूणांनी त्यांना राईनपाडा गावातील ग्रामपंचायतीमध्ये डांबले आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी आता २६ जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अफवांचे पेव

व्हॉटसअॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत आहेत. यामध्ये मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा देखील पसरली. धुळ्यातील राईनपाडा येथे झालेली मारहाण ही मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून झाली आहे. मालेगावमध्ये देखील याच प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. शिवाय, देशातील अनेक भागांमध्ये देखील सोशल मीडियावरील मेसेज पाहून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरची प्रत्येक गोष्ट पडताळा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन माय महानगर करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -