घरताज्या घडामोडीधक्कादायक घटना! मंत्रालयात एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक घटना! मंत्रालयात एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

मुंबईतील मंत्रालय परिसरात एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मंगळवारी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.वारंवार खेटे घातल्यानंतरही राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याने या महिलेनेकाल, सोमवारी दुपारी मंत्रालयाबाहेर विष घेतले होते.

मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीतल गादेकर असं या महिलेचं नाव असून ही महिला धुळ्यात राहते. मात्र, काल तिने मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जे जे रुग्णालयात दाखल केलं. धुळे एमआयडीसीमधील एका प्लॉटसंदर्भात हा वाद होता. त्यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण ?

शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर पी-१६ आहे. २०१० मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करून शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे असलेला हा प्लॉट नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस नोटरी बनवून नावावर करून घेण्यात आला. त्यानंतर तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विनाकायदेशीर खरेदी खत ऐवजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बोगस सह्या करून शीतल गादेकर यांचे पती रवींद्र गादेकर यांच्या छायाचित्राचा गैरवापर करत बोगस इसम उभा केला. त्याच्या माध्यमातून हा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला, अशी तक्रार शीतल गादेकर यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती.

- Advertisement -

२०२० पासून शीतल गाडेकर यांनी या जागेच्या संदर्भात सतत पाठपुरवठा सुरू ठेवला होता. परंतु २७ मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर नवी मुंबईच्या संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भूखंडासाठी लढा अयशस्वी ठरल्यामुळे या दोघींनी मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संगीता डवरे यांच्या पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च झाला होता. त्यामध्ये मोठी तफावत करण्यात आली असून आमची फसवणूक झाल्याचा आरोप डवरे यांनी केला होता. पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

मावळच्या (जि. पुणे) रमेश माेहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जनता जनार्दन प्रवेशद्वारावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अपंगांना मिळणाऱ्या १ हजार ५०० रुपयाच्या पेन्शमध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे या तिन्ही प्रकरणाचा तपास करत आहे.


हेही वाचा : राज्यात महागाईचा झटका, ‘सरकार गतिमान, महागाई वेगवान’; राष्ट्रवादीचा सरकारला टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -