घर महाराष्ट्र साताऱ्यात दोन्ही राजे आमने-सामने !! वाचा त्यानंतर काय घडले??

साताऱ्यात दोन्ही राजे आमने-सामने !! वाचा त्यानंतर काय घडले??

Subscribe

'माझा खांदा सारखा का दाबता?' मी फिट आहे. प्रात्यक्षिक करून दाखवतो असं म्हणत उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी कोपरखळी काढली.

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. पण, कुडाळमधील एका कार्यक्रमामध्ये दोन्ही राजे पुन्हा एकदा आमने – सामने आले. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र्रसिंहराजेंचा खांदा दाबला. त्यानंतर शिवेंद्र्रसिंहराजेंनी ‘माझा खांदा सारखा का दाबता?’ मी फिट आहे. प्रात्यक्षिक करून दाखवतो असं म्हणत उदयनराजेंना कोपरखळी काढली. दरम्यान, तालुक्यात दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या डायलॉगबाजीची चर्चा अगदी जोरात रंगली आहे. कुडाळमधील मारूती मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आज ( बुधवारी ) पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही राजेंनी हजेरी लावली होती. यावेळी मंदिरातून बाहेर येताना दोन्ही राजे समोरासमोर आले. यावेळी दोन्ही राजांमध्ये विनोदातून डायलॉगबाजी सुरू होती.

‘तुमची गाडी चांगली आहे’ असं उदयनराजे म्हणाले. त्यानंतर खासदार आणि आमदारांच्या गाडीत फरक असतो असं मिश्किल उत्तर शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. दरम्यान, उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवून तो दाबला. त्यावेळी मी फिट आहे. प्रात्यक्षिक करून दाखवतो असं म्हणत उदयनराजेंना कोपरखळी काढली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -