घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंनी केला सत्तारांना फोन? सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश

एकनाथ शिंदेंनी केला सत्तारांना फोन? सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश

Subscribe

मुंबई – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यभरात सत्तारांविरोधात आंदोलन सुरू आहे. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येतेय. दरम्यान, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केली असून त्यांनी सत्तारांना फोन करून सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले असून दुसरीकडे शिंदेंनी गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. हे प्रकरण कसं शांत करायचं याबाबत या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?

सुप्रिया सुळेंनी अलीकडे अब्दुल सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, ज्यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुमच्याकडे 50 खोके असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका पुन्हा केली. ज्यावर आज सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंना शिवागाळ करत तुम्हालाही देऊ असे उत्तर दिले. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच खवळले आहे, विरोधकांकडून सत्तारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

सत्तारांनी मागितली माफी

सत्तार म्हणाले की, मी कोणत्याच महिलेविरोधात अपशब्द बोललो नाही. आणि मी जे बोलले ते आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. सुप्रिया सुळे.. किंवा कोणत्याही महिलेचं मनं दुखवेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही, जर कोणत्या महिलांना वाटत असेल मी आक्षेपार्ह बोललो, आणि त्यांची मनं दुखावली तर मी जरूर खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही, जे खोक्यांचा आरोप करत आहेत त्यांनी मी बोललो, मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ महिलांबाबत काढत आहेत. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. सत्तारांनी केवळ माफी न मागता त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -