Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'राऊत' आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांचा खोचक प्रश्न

‘राऊत’ आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांचा खोचक प्रश्न

Subscribe

औरंगाबाद : ‘राऊत’ आले नाहीत का? असा खोचक प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना केला आहे. राज्य सरकारची आज मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी 59 हजार कोटीच्या पॅकजे दिले आहे. यातून नदीजोड प्रकल्पाती 14 हजार कोटी रुपये वगळून 25 हजार कोटीचे पॅकेज दिले आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीला संजय राऊत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी

मुख्यमंत्री म्हणाले, “आजच्या मंत्रिमंडळात 45 हजार कोटीपेक्षा जास्तीचा प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. स्वामी रामानंदतीर्थ यांचा पुतळा दिल्लीत बसवण्याची मागणी आली आहे. त्यावर आपण सरकार काम करेल. तसेच रामकृष्ण गोदावरी सिंचन योजनेचा तो देखील आपण मार्गी लावू. बाकी मला वाटते की, राऊत नाही आले का?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर उपस्थिता हर्षा पिकला. यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “विकास राऊत”, असे म्हणत त्यांनी एका पत्रकाराचे नाव घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : …तर ती जबाबदारी तुमची होती; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

घोषणा करून कागदावर ठेवत नाहीत

मुख्यमंत्री म्हणाले, “मराठावाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. पण खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती अमृतवर्ष. मराठवाड्यातील लोकांसाठी दिलासा आणि धारा देण्यासाठी ही बैठक झाली आहे. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैठक झाली होती. काही लोक म्हणतात की, घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही. मी तुम्हा सांगतो की, वर्षभरात महायुती सरकारने जे निर्णय घेतले. मग ते पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत आम्ही सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी देण्यासाठी 35 सुधारीत सिंचन प्रकल्पना मान्यता दिली. 8 लाख लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यामुळे आम्ही फक्त घोषणा करून कागदावर ठेवत नाहीत. त्यांची अंबलबजावणी करतो.”

- Advertisement -

 

- Advertisment -