घरताज्या घडामोडीकोल्हापुरमध्ये दगावलेला रुग्ण करोनाग्रस्त नाही

कोल्हापुरमध्ये दगावलेला रुग्ण करोनाग्रस्त नाही

Subscribe

कोल्हापुरमध्ये दगावलेली व्यक्ती ही करोनाग्रस्त नसल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापुरमध्ये एक करोना संशयित दगावला असल्याची माहिती अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवली होती. मात्र, हा रुग्ण करोनाग्रस्त नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संबंधित रुग्ण टेम्पो चालक होता, त्याने कधी परदेश प्रवासही केलेला नसल्याचे देखील स्पष्टीकरण राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिले आहे.

करोनाचा रुग्ण नसलेल्याची माहिती

कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयात रविवारी सायंकाळी एका करोना संशयित रुग्ण असलेल्या ६८ वर्षीय वुद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही माध्यमांतून प्रसारित झाले. या व्यक्तीच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा करोनाचा रुग्ण नसलेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित रुग्ण टेम्पो चालक होता, त्याने कधी परदेश प्रवासही केलेला नाही, अशी माहिती राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली असून मृत्यू झालेल्या या व्यक्तीला श्वसनासंबंधीचा आजार होता. मात्र, त्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता हा रुग्ण करोनाग्रस्त नव्हता हे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापुरात करोना संशयित महिलेचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -