घरमहाराष्ट्र'गुरुपौर्णिमा' आणि 'शिक्षक दिवस' यात फरक काय?

‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘शिक्षक दिवस’ यात फरक काय?

Subscribe

गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिवस या दोन्ही दिवशी गुरुजणांची पूजा केली जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. परंतु, तरीही दोन्ही दिवसांमध्ये नेमका फरक काय? याविषयी माहिती जाणून घेऊया.

देशात ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘शिक्षक दिवस’ मोठ्या आनंदात साजरे केले जातात. हे दोन दिवसात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. तरीही ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘शिक्षक दिवस’ यामध्ये काय फरक आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आषाढी पौर्णिमेस ‘गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी आपल्या आयुष्यात आलेले प्रत्येक गुरुजणांचे आभार मानले जातात. तर ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकी व्यवसायातील सर्व गुरुजणांचे आभार मानले जातात.

गुरुपौर्णिमेस ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात

गुरुपौर्णिमेस ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा केली जाते. महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ ‘गुरुपौणिमा’ साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेल्या गुरुजणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. व्यास यांनी ‘महाभारत’ ग्रंथ लिहिला आहे. त्याचबरोबर वेदाचे अर्थपूर्ण विभाजनही त्यांनी केले आहे. अशा या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरा केली जाते.

- Advertisement -

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ ‘शिक्षक दिवस’

भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रसिद्ध शिक्षक होते. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले होते. ते शिक्षणाला जास्त महत्व देत. ते एक आदर्श शिक्षक होते. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मरणार्थ या दिवशी ‘शिक्षक दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी देशाभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. शाळेतील विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे आभार मानतात. या दिवशी शाळांमध्ये शिक्षकांवर वेगवेगळे गाणे बोलणे, भाषणे करणे असे बरेच उपक्रम शाळांमध्ये केले जातात.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -