फडणवीसांनी साडेचार कोटींची रेमडेसिवीर कोणत्या अकाउंटमधून खरेदी केली?

देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा; काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांची मागणी

LOP devendra fadnavis

रेमडेसिवीरचा साठा केल्याप्रकरणी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने वातावरण तापलं आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तात्कळ पोलीस स्टेशनला पोहले. यावरुन आता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

दिग्विजय सिंग यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार कोटींची रेमडेसिवीर कोणत्या अकाउंटमधू खरेदी केली? तसंच कुणाच्या परवानगीनं त्यांनी रेमडेसिवीर खरेदी केली याची चौकशी व्हायला हवी. हा लाजीरवाणा प्रकार आहे,” असं ट्विट दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.

हे कृत्य मानवतेच्या विरोधात

जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीरसाठी वणवण करत आहेत आणि लोक जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर मिळावं म्हणून आटापिटा करत आहेत. तेव्हा जबाबदार पदावर राहिलेल्या भाजप नेत्यानं रेमडेसिवीरची साठेबाजी करावी हे कृत्य मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा – इंजेक्शनचा तो साठा सरकारला देण्यास फडणवीसांनी मदत करायला हवी होती – बाळासाहेब थोरात