बारामती : शरद पवार यांची भेट घेण्यामागे कोणताही संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचे निवासस्थान मोतीबागेत आज भेट झाली. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. पण अजित पवारांनी पक्षासोबत बंड केल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे त्यांच्यासोबत केले आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दिलीप वळसे-पाटील आणि शरद पवार याच्यात मोतीबागेत भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील म्हणाले, “गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यासोबत बैठक ठरली होती. यामुळे शरद पवार आणि माझी भेट ही पूर्वनियोजित होती. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेचे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. यानिमित्ताने शरद पवारांची भेट झाली, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा – शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची ‘मोदीबागे’त भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
शरद पवारांच्या मार्गदर्शन घेतो
या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होते, या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, “संभ्रमाचे काही कारण नाही. कारण मी अनेक संस्थावर काम करत आहे. यात वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव प्रतिष्ठ, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ या संस्थावर काम करत असताना. आम्ही नेहमी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत आलो आहे. आजही तेच मार्गदर्शन घेऊन सर्व संस्थांचा कारभार पुढे नेहण्यासंदर्भात, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोणातून आणि राज्यात दुष्काळी परिस्थिती यासंदर्भात चर्चा झाली असून राज्य सरकारने दुष्काळाबाबत काही निर्णय घेतलेले आहे. ते सर्व निर्णय शरद पवार यांच्या कानावर घातले आहे.” संस्थात्कम राजकारणात अंतिम शब्द कोणाचा आहे, या प्रश्नार दिलीप वळसे पाटील म्हणाले, “संस्थात्मकमध्ये शरद पवार हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा अंतिम शब्द मानला जातो.”
हेही वाचा – Mahua Moitra: महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? परदेशातून लोकसभेचं खातं 47 वेळा केलं गेलं लॉग इन
स्थानिक पातळीवर प्रश्नांचा परिणाम
आंबेगाव ग्रामपंचयात तुमच्या हातातून गेली आहे, यासंदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मी अजून गावी गेलो नाही. 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यातील 24 ग्रामपंचयतीचे सरपंच आमच्या विचारांचे आलेले आहेत. चार स्थानिक आघाड्या होत्या आणि दोन जागा शिंदे गटाला मिळालेली आहे. यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये थोडा बदल झाला आहे. स्थानिक पातळीवर प्रश्न होते. त्यांचा परिणाम झालेला असावा, मी गावी गेल्यानंतर ग्रामस्थानशी बोलेण.”