Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

Related Story

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तसे पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे स्पष्ट केले आहे. याशिवाय गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही पत्रात नमूद केले आहे. यामुळे आता दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री असणार आहेत, हे निश्चित झाले.

दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार सोपवल्यानंतर सध्या त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावा, अशी पत्रात विनंती करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गृह खात्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चा होती. शेवटी वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

- Advertisement -

शांत, संयमी आणि अभ्यासू
वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार शरद पवार यांनी केला.

- Advertisement -