Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रPolitics : ट्रम्पेटने काही मतं घेतली, मला लाभ झाला; पवारांसोबतच्या भेटीनंतर वळसे...

Politics : ट्रम्पेटने काही मतं घेतली, मला लाभ झाला; पवारांसोबतच्या भेटीनंतर वळसे पाटील म्हणाले…

Subscribe

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी वळसे-पाटलांना पाडण्याचा चंग बांधला होता. मात्र, वळसे-पाटील हे शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले. विशेष म्हणजे विजयी होताच वळसे-पाटील तिसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेले.

मुंबई : दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मानसपूत्र समजले जातात. मात्र, राष्ट्रवादीतील बंडानंतर वळसे-पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी वळसे-पाटलांना पाडण्याचा चंग बांधला होता. मात्र, वळसे-पाटील हे शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले. विशेष म्हणजे विजयी होताच वळसे-पाटील तिसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भेटीचे कारण सांगितले आहे. (Dilip Walse-Patil meets Sharad Pawar after winning the assembly elections)

शरद पवारांची भेट घेतली. कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. मी प्रतिष्ठाणच्या विश्वस्त या नात्याने बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त अशी चर्चा झाली, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली. यानंतर त्यांना विचारण्यात आले की, शरद पवार यांनी तुमच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना पाडा असे म्हटले होते. पण आता तुमच्या विजयानंतर त्यांनी तुमचे अभिनंदन केले का? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले की, मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ते सभेमध्ये काय बोलले हे मी आता विसरून गेलो आहे. या भेटीवेळी राजकीय चर्चा काही झाली नाही. फक्त प्रतिष्ठाणच्या संदर्भात चर्चा झाली. दुसरी काही चर्चा झाली नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”

राज्यातील निकालसंदर्भात तुमच्या दोघांमध्ये काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता वळसे-पाटील म्हणाले की, निकालाच्या संदर्भात चर्चा झाली, पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय-काय घडलं त्याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वत: निकालाबाबत काहीच चर्चा झाली नाही, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, राज्यातील निकालाबाबत शरद पवारांची भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारला असात वळसे-पाटील म्हणाले की, ते काय बोलले हे मी सांगणं उचित नाही. पण त्यांनी वेगळ्या प्रकारची निवडणूक झाल्याचे म्हटले. त्याचं मत मला पटलं.

- Advertisement -

टम्पेटने मत घेतल्याने मला लाभ

दरम्यान, तुमच्या मतदारसंघामध्ये टम्पेटने मतं घेतली, याचा तुम्हाला लाभ झाला असे वाटते का? असा प्रश्न विचारला असता वळसे-पाटील म्हणाले की, हो हे खरं आहे. टम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मलाही झाला. पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघात निवडणुकीमध्ये टम्पेटचा लाभ झाला किंवा नाही, यावर काहीच चर्चा झाली नाही. दरम्यान, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी म्हटले आहे की, काही आमदार आमच्याकडे येऊ इच्छितात, ते आमच्याकडे आले तर स्वागत आहे. तर भविष्यात पवार गटाचे आमदार तुमच्या पक्षात येऊ शकतात का? असा प्रश्न विचारला असता वळसे-पाटील म्हणाले की, मला माहित नाही. कारण माझ्याशी तरी याबाबतीत कोणी बोलणं केलेलं नाही. त्यामुळे कोण कोणाशी बोललं आहे आणि आपल्या कोण येणार याबद्दल आताच बोलणं उचित नाही. तसेच अशी चर्चा कुठे झाली असेल, असं मला वाटत नाही.

हेही वाचा – Thackeray Group : आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या गटनेतेपदी, तर भास्कर जाधव विधानसभेचे गटनेते अन् सुनील प्रभू प्रतोदच


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -