घरताज्या घडामोडीफडणवीसांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून किंवा अडचणीत आणण्यासाठी नव्हती, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

फडणवीसांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून किंवा अडचणीत आणण्यासाठी नव्हती, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आरोपी म्हणून नव्हती तर त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना हवी होती यासाठी पाठवण्यात आली होती. असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिले. विधानसभेत फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीवरुन विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणला. यानंतर आरोपांवर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांचा दावा खोडून काढला आहे. फडणवीसांना जाणीवपूर्वक अडकवण्याची राज्य सरकारची भूमिका नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत विरोधकांना उत्तर देताना म्हटलं आहे की, विरोधी पक्षनेत्यांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून नव्हती पाठवली, त्यांच्याकडे माहिती मिळाली ती कुठून मिळाली याबाबत होती. त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा कशात फसवण्याचा राज्य सरकारची भूमिका नाही. पोलीस चौकशी करतील आणि त्याचा अहवाल येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले

- Advertisement -

विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे. प्रिव्हिलेज काय आहेत. सभागृहातील सदस्यांच्या प्रिव्हिलेजमध्ये काही दुमत नाही. कुठलीही माहिती दिली तरी सदस्यांना काही विचारु शकतात. एक घटना अशी घडली की राज्याच्या पोलीस विभागातून काही फोन टॅपिंग चुकीच्या पद्धतीने परवानगीने झाले. त्याच्यावर टॅप केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न मांडला पण यामध्ये चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती.

फडणवीसांनी प्रश्नावलीवर उत्तर दिलं नाही

या समितीने अहवाल दिल्यानंतर गुन्हा अज्ञात व्यक्तिविरोधात दाखल झाला. जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा चौकशी कऱण्याचे काम तपास अधिकाऱ्यांवर असते. तपास सुरु असताना २४ लोकांचे जबाब घेतले जे प्रश्न वाटले त्यावर जबाब घेतला. सीआरपीसी १६० मध्ये तपास अधिकाऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर तसा घेण्याचा अधिकार त्यांना आहे. आधी नोटीस दिली होती. प्रश्नावली पाठवली होती त्यामुळे त्याचे उत्तर विरोधी पक्षनेत्यांनी दिले नाही. यामुळे पोलिसांनी १६० ची नोटीस पाठवली याचा अर्थ एवढाच आहे की, तुम्ही यावर जबाब द्या, यामध्ये कुठे जबाब घ्यायचा हे ठरलं आणि घरी जबाब घेतला असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं.

- Advertisement -

मी प्रश्न उत्तरे पाहिली नाहीत. म्हणून चौकशी काय सुरु आहे. एसआयडीमधील हा डेटा बाहेर कुठे गेला. विरोधी पक्षनेत्यांनी पेन ड्राईव्ह दिला. तपास यंत्रणा चौकशी करत असताना केंद्रीय विभागााल पत्र लिहून ते मागितले आहे. सगळ्याची संबंधित आहे. त्याचे सर्कल पूर्ण व्हावे लागते. विरोधी पक्षनेते त्यांच्याकडे काय माहिती आहे. पोलिसांनी प्रश्न विचारला तरी त्यांनी उत्तर काय द्यावे हा रुटीनचा भाग आहे. आज ते आहेत उद्या आणखी कोणी असेल हा चौकशीचा भाग आहे. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.


हेही वाचा : फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीवर स्थगन प्रस्ताव आणणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -