घरताज्या घडामोडीसरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा मात्र CID मार्फत तपास करणार, दिलीप वळसे...

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा मात्र CID मार्फत तपास करणार, दिलीप वळसे पाटलांची माहिती

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनचे ऑडीओ आणि व्हिडीओ सादर केले आहे. आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी सीआयडी करेल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर उत्तर देताना म्हटलं आहे की, १२५ तासांचे फुटेज आहे. स्टिंग ऑपरेशन झाले. अनेक गोष्टी पुढे येतील. मला माहिती आहे की, तुम्ही काही पेनड्राईव्ह दिले आहेत काही राखून ठेवले आहेत. जशी गरज लागेल तसे काढाल न काढाल माहिती नाही. परंतु एकच सांगायचे आहे. तुमचा आरोप काही असला तरी मी कोणाची पाठराखण करणार नाही. पण हे प्रकरण आपल्याला तपासावे लागेल या घटनेच्या पाठी कोण आहे? ही घटना कशी पुढे न्यायाची, दोषी कोण, कारवाई काय करायची असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

ज्या गिरीश महाजनांच्या केसबाबत आपण बोलला आहात. गिरीश महाजन यांच्याविरोधात षडयंत्र करतो आहे. कुभांड करतो आहे. पोलिसांचा दुरुपयोग करतो आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची स्थापना २०१७ मध्ये झाली आहे. १९१७ ला स्थापना झाल्यानंतर भोयटे आणि पाटील या गटात वाद आहे. अनेक ठिकाणी कोर्टबाजी झाली आहे. तो वाद अद्याप सुटला नाही कोर्टात काय होईल ते होईल. ही घटना झाली आणि २९ आरोपींना अटक केले आहेत. या निमित्ताने एवढेच विचारतो या संस्थेला पोलीस बंदोबस्त घेऊन शाळा का चालवावी लागते. १७ -२-१८ पासून पुढच्या वर्षामध्ये पोलीस बंदोबस्त दिला आहे. ३०० दिवसापेक्षा पोलीस बंदोबस्त दिला गेला आहे. एवढेच सांगायचे आहे की, ही घटना जुनी असली तरी याच्या संदर्भातील खरी वस्तुस्थी समोर आली पाहिजे यासाठी आपण कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान वळसे पाटील पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले आहे. की, पुण्यात घटना घडली आहे. गुन्हा दुसरीकडे दाखल केला मग पुण्याला ती वर्ग करण्यात आली. सुशांतच्या बाबत गुन्हा बिहारमध्ये दाखल केला आणि तो सीबीआयकडे देण्यात आला. याचा अर्थ मी समर्थन करतो असे नाही. असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का?

आपण मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवाराचा पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी दिला आज पुन्हा दिला आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढला का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे.


हेही वाचा : फडणवीसांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून किंवा अडचणीत आणण्यासाठी नव्हती, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -