घरमहाराष्ट्रमराठीची शाळा करतंय कोण? मराठी संवर्धनाची दिंडी उद्या मुंबईत

मराठीची शाळा करतंय कोण? मराठी संवर्धनाची दिंडी उद्या मुंबईत

Subscribe

मुंबईत उद्या, २७ जून रोजी हा कार्यक्रम दादरच्या शिवाजी मंदिरात (Shivaji Mandir, Dadar) सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वामीराज प्रकाशनच्या वतीने मराठी आठव दिवसाचे (Marathi Athav Divas) आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत उद्या, २७ जून रोजी हा कार्यक्रम दादरच्या शिवाजी मंदिरात (Shivaji Mandir, Dadar) सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. (Dindi of Marathi Athav Divas in Mumbai tomorrow)

हेही वाचा – रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

- Advertisement -

मराठी बोला, मराठी वाचा आणि मराठी लिहा या उद्देशाने मराठी आठव दिवस उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला कणकवली, गोवा, औरंगाबाद, नाशिक, बेळगाव आणि नवी दिल्ली येथील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मराठी आठव दिवसाची दिंडी आता मुंबईत येणार आहे.

कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वामीराज प्रकाशनच्या वतीने दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठव दिवसाचे आयोजन केले जाते. मराठी भाषा गौरव दिन एक दिवसापुरता मर्यादित राहू नये याकरता मराठी आठव दिवस या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेसंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – बंडखोर आमदारांच्या मुक्कामात वाढ; ३० जूनपर्यंत गुवाहाटीतच राहणार

मराठीची शाळा कोण करतंय? या विषयावरील परिसंवादाचे या उपक्रमात आयोजन करण्यात आले आहे. तसेच, माय बोली साजिरी हा समृद्ध मराठी संस्कृतीचा अभिवाचनात्मक आविष्कारही सादर करण्यात येणार आहे. या परिसंवादात आमदार सुनील प्रभू, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे, शिक्षण संस्था संचालक संघटनेचे अध्यक्ष भाऊ कोरगांकर व ‘य म’ मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर आणि आम्ही शिक्षक व संस्था चालक संघचे समन्वयक सुशील शेजूळ यात सहभागी होतील.

दरम्यान, मराठी आठव दिवस उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून झाली होती. यावर्षी २७ मार्च रोजी कोल्हापुरातील मराठी शाळेत शिकणाऱ्या रचना कोडोलीकार, सारीका राठोड आणि झोया मुजावर या तीन अमराठी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर २७ एप्रिल रोजी कणकवली आणि २७ मे रोजी पणजी, गोवा येथे मोठ्या जल्लोषात कार्यक्रम साजरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -