Homeमहाराष्ट्रState Election Commissioner : दिनेश वाघमारेंनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार

State Election Commissioner : दिनेश वाघमारेंनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार

Subscribe

राज्यपालांनी दिनेश वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.

मुंबई : यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. यानंतर राज्यपालांनी दिनेश वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. (Dinesh Waghmare takes charge as State Election Commissioner)

दिनेश वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (1987) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणक शास्रात एमटेक (1989), तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एमएस्सी (2007) केले आहे. 1994 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले दिनेश वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

हेही वाचा – Sushama Andhare : मुख्यमंत्रीचं सर्व आका-बाकांचे सरताज आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिनेश वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव, तसेच नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

दिनेश वाघमारे विविध पुरस्कांनी गौरव

दरम्यान, दिनेश वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया 2021 अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड 2021, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा – Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश धस यांचे आवाहन