182 कोटींच्या बनावट आयटीसी प्रकरणात मोठी कारवाई, रोबोस्टीलच्या संचालकाला अटक

मुंबई – नवी मुंबईत जीएसटी महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांनी रोबोस्टील ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधीत ही कारवाई केली आहे. या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई जीएसटी, महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी रोबोस्टील ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला अटक केली. त्याला 1,075 कोटी रुपयांच्या बनावट चालानच्या आधारे 182 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) बेकायदेशीररीत्या वापरल्याबद्दल अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.