Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महिलांचे बेपत्ता होणे हा लव्ह जिहादचा प्रकार नाही, रुपाली चाकणकरांनी दिले स्पष्टीकरण

महिलांचे बेपत्ता होणे हा लव्ह जिहादचा प्रकार नाही, रुपाली चाकणकरांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

महिलांचे बेपत्ता होणे हा लव्ह जिहादचा प्रकार नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकृडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आता चाकणकर यांच्याकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.

2022 या वर्षी महाराष्ट्रातून 535 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या बाबतची माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. महिलांचे बेपत्ता होणे हा लव्ह जिहादचा प्रकार नसल्याचे आता त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी चाकणकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ठाण्यात जनसुनावणी घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Disappearance of women is not a form of love jihad, explains Rupali Chakankar)

हेही वाचा – स्वा. सावरकर स्मारकाची भयाण अवस्था; जयंती-पुण्यतिथीलाच होते आठवण, अन्यथा साफ दुर्लक्ष

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “पुण्याच्या घटनेनंतर मी पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्तालयात अशा घटनांची माहिती विचारली. तेव्हा अशी एखादीच घटना आहे. 2022 मध्ये 535 महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील मुली-महिलांची मानवी तस्करी झालेली असू शकते. ती शक्यता नाकारता येणार नाही. पुण्यात एक घटना घडली. ते कुटुंब मला येऊन भेटलं आणि त्यामुळे माझ्याकडे ही आकडेवारी आली.”

तसेच, “बेपत्ता महिलांचे सर्व प्रकार लव्ह जिहादचे वाटतात का?” असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी रुपाली चाकणकर यांना विचारला. याबद्दल बोलताना चाकणकर यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणाल्या की, “हे प्रकार लव्ह जिहादचे वाटत नाही. लॉकडाऊनच्या काळात घरातील वडील किंवा भाऊ अशा कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. त्यामुळे काही महिला मुलींना व्यावसाय-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावं लागलं.”

- Advertisement -

“या काळात काही एजंटच्या माध्यमातून नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं. आम्ही तुम्हाला चांगली नोकरी देऊ असं सांगण्यात आलं आणि त्यावेळी नोकरीची गरज असल्याने या महिला मुलींनी एजंटकडे नावनोंदणी केली. तर एजंट त्यांना जेव्हा आखाती देशात घेऊन गेले तेव्हा विमानतळावरच त्यांची कागदपत्रे, मोबाईल जमा करून घेतले. या सर्व महिला मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या, ” अशी माहिती देत रुपाली चाकणकर यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेपत्ता महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहीम राबवावी, तसेच या मोहिमेअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर 15 दिवसांनी आयोगाला सादर करावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गृह विभागाला दिल्या होत्या. तसेच राज्य सरकारने बेपत्ता महिलांच्या शोधासाठी नेमलेल्या समितीमध्ये पोलिसांचा समावेश नाही असे सांगत याकडे लक्ष वेधत यात पोलिसांचा समावेश असावा, अशी अपेक्षा चाकणकर यांनी व्यक्त केली होती.

- Advertisment -