Thane : अडकलेल्या चिमुरड्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आपत्ती आणि अग्निशमन दलाला यश

घराचा दरवाजा आतून अचानक बंद होऊन दोन वर्षीय शिव पांडुरंग जगताप हा चिमुरडा अडकल्याची घटना गुरुवारी सकाळी कोर्ट नाका येथील जुनी पोलीस वसाहतीत घडली. दरवाज्याची आतून कडी लागलेला दरवाजा यशस्वीरित्या ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने उघडून त्या चिमुरड्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

ठाणे कोर्ट नाका येथील जुनी पोलीस वसाहत, बिल्डींग क्र.१४ जवळ, सेंट्रल समोरील तिसर्‍या मजल्यावरील खोली क्र.१५ येथे शिव हा त्याच्या पालकांसोबत राहत असून सकाळच्या सुमारास शिव याला त्याची आई घरात ठेवून कपडे वाळत घालण्यासाठी टेरेसवर जात होती. त्या घराबाहेर दरवाजा ओढून जात असल्याचे पाहून तो त्याच्या आईच्या मागे गेला. याचदरम्यान शिव याच्या हातून दरवाज्याला आतून कडी लागली. त्यामुळे तो घरात अडकला.

बाहेरून कडी उघडता येत नव्हती. त्यातच शिव हा मोठ मोठयाने रडत आहे. याची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल आणि ठाणेनगर पोलीस या विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागील बाजूने शिडी लावून खिडकीतून घरात प्रवेश करून लागलेली कडी उघडून रडणाऱ्या शिव याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा : Malegaon Congress : मालेगावात काँग्रेसला खिंडार, अजितदादांच्या उपस्थितीत २८ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार