मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच काही केल्या सुटत नसल्याचे चित्र आहे. मात्र, यावर योग्य तो निकाल देण्याच्या प्रक्रियेला वेग येत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावल्यानंतर ठाकरे गटानेही नार्वेकरांबाबत मोठा खुलासा केला आहे. आता या प्रकरणात नेमके काय घडते ते पहावे लागणार आहे.(Disclosure by Thackeray group on hearing held by Assembly Speaker Said so they)
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीची तारीख निश्चित केली तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी घाईघाईने 14 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी घेतली. मात्र आता प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
हेही वाचा : Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधानाच्या भाषणाचे कौतुक; पण…
न्यायालयाचाही आदर राखला पाहीजे
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईम अर्थात योग्य वेळेत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यात यावा, असे न्यायालयाने नमूद केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ज्याप्रकारे आम्ही तुमचा घटनात्मक संस्था म्हणून आदर राखतो, त्याचप्रकारे या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचाही आदर राखला पाहीजे असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
हेही वाचा : घाईत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही- राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी अनेक महिने याप्रकरणी नोटीस बजावलेली नव्हती. आम्ही त्यांना आतापर्यंत तीन निवेदने दिली. त्यामध्ये 15 मे, 23 मे आणि 2 जून रोजी निवेदने दाखल केली. त्यानंतर 4 जुलै रोजी आम्ही याचिका दाखल केली. त्याच्या 10 दिवसांनी म्हणजेच 14 जुलै रोजी नोटीस जारी करण्यात आली आणि 14 सप्टेंबर रोजी हे प्रकरण विधीमंडळाच्या कामकाजात सूचीबद्ध करण्यात आलं. आम्ही जेव्हा अध्यक्षांकडे जातो तेव्हा त्यांचा प्रत्येक आमदाराने शंभर-शंभर उत्तरं देतात असाही युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.