घरमहाराष्ट्रशेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात शिंदे-फडणवीसांनी घेतला हा निर्णय...

शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात शिंदे-फडणवीसांनी घेतला हा निर्णय…

Subscribe

मुंबई | सनदी अधिकाऱ्यांना शेअर मार्केटमधील (Share Market) गुंतवणुकीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सनदी अधिकारी माहिती लपवू शकत नाही. यासंदर्भात राज्य सरकारने बुधवारी आदेश देखील जारी केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांना स्टाँक, शेअर्स आणि अन्य गुंतवणुकीतून सट्टेबाजी करण्यास बंदी करण्यात आली आहे. परंतु, स्टॉक ब्रोकर्स आणि इतर एजंटच्या माध्यमातून त्यांना प्रासंगित गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली होती. या नव्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या एका वर्षाच्या कालावधीत स्टॉक, शेअर्स आणि इतर माध्यमांमधील गुंतवणूक ही शासकीय अधिकाऱ्यांच्या सहा महिन्याच्या मूळ वेतनाच्या अधिक होत असेल तर त्यांच्या व्यवहाराची माहिती सादर करावी लागेल. तसेच सनदी अधिकाऱ्यांना वारंवार शेअरची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.

- Advertisement -

यासंदर्भात सनदी अधिकाऱ्यांना दरवर्षी माहिती जारी करणे हे बंधनकारक राहणार आहे. यामुळे सनदी अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यावर वचक बसेल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -