घरमहाराष्ट्रबुटक्या अंबू गाईची पश्चिम महाराष्ट्रात चर्चा

बुटक्या अंबू गाईची पश्चिम महाराष्ट्रात चर्चा

Subscribe

बुटकी माणसे दिसतात. पण जनावरांमध्ये बुटकेपणा क्वचितच आढळतो. म्हणून जेव्हा अशी बुटकी जनावरे समोर येतात त्याचे अनेकांना त्याचे अप्रूप वाटते. खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील सफल जाधव या शेतकर्‍याच्या गोठ्यात एका अंबू गाय पहायला मिळाली. अंबू म्हणजे बुटकी. या अंबू गाईची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. इतकेच नव्हेतर सांगली पसुल राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी प्रदर्शनातही या गाईची खूप चर्चा होती.

अंबू गाईच्याच्या मालकाने तिला प्रथमच सांगली पसुल येथील प्रदर्शनातून सार्वजनिक केले होते. त्यामुळे संपुर्ण प्रदर्शनात या बुटक्या अंबूला पहाण्यासाठी गर्दी होत होती. प्रदर्शनात येणारी लोक मुलं, बायका या बुटक्या गाई बरोबर मोबाईलमध्ये सेल्पी टिपण्यासाठी गर्दी करत होते. अंबू देखील सर्वांसोबत मिळून-मिसळून त्यांना खुश करत होती. ही गाय सध्या सात महिन्यांची गाभण देखील आहे.त्यामुळे अंबू लवकरच आपल्यासारख्या आणखी एका वासराला जन्म देणार आहे. एखादा माणूस जसा बुटका राहिला असतो तशीच ही गाय देखील बुटकी राहिली आहे. त्यामुळे ही गाय पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे

- Advertisement -

बुटकी गाईची वैशिष्ट्ये…..

अंबू गायीची उंची 2 फूट 3 इंच, लांबी 3 फूट

गायीचं वय 4 वर्ष 6 महिने

- Advertisement -

भारतातातील सर्वात बुटकी म्हणजेच लहान गाय अशी या गायीची ओळख

अंबु गाय ही खिलार मिक्स जातीची आहे. एखाद्या बुटक्या माणसाप्रमाणे ही गाय आहे

सर्वसाधारण गायीपेक्षा अंबू ही गाय 25 टक्केच खाद्यं खाते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -