सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंच्या संस्थानातील ‘या’ शिवसैनिकाच्या नावाची चर्चा

Discussion for Rajya Sabha on the name of Sanjay Pawar, a Shivsainik from Sambhaji Raje's Sansthan for the sixth seat
Discussion for Rajya Sabha on the name of Sanjay Pawar, a Shivsainik from Sambhaji Raje's Sansthan for the sixth seat

शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला अल्टीमेटम संपला आहे. यानंतर आता शिवसेना कट्टर शिवसैनिकांना पदाधिकाऱ्याला राज्यसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक नाव समोर आले आहे. कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. या शिवाय माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेंत्री उर्मिला मातोंडकर यांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेनेची भूमिका –

आज दुपारी १२ वाजता वर्षावर येऊन शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजेंना दिली होती. मात्र, संभाजीराजेंनी ऑफर नाकारत सकाळी मुंबईहून कोल्हापूरकडे प्रयाण केले. यातून त्यांनी आपण अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. संभाजीराजेंच्या ठाम भूमिकेनंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, सहाव्या जागेसाठी शिवेसेनेचा उमेदवार जिंकून येणार, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

या आश्चर्यकारक नावची चर्चा –

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांचे नाव चर्चेत आहे. याशीवाय औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची नावे चर्चेत आहेत. राज्यसभेसाठीचे आश्चर्यकारक नाव म्हणजे कोल्हापूरचे संजय पवार हे आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली २५ ते ३० वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केले आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आहे. पक्षाने यंदा ग्रामीण भागातील शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवायचे ठरवले आहे. त्यामुळे पवारांच्या नावाची चर्चा होत आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली आहे. छत्रपती संभाजीराजेंना शह देण्याासाठी कोल्हापुरातीलच सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा विचार शिवसेनेमध्ये आहे. त्याच दृष्टीकोनातून संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.