विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची चर्चा

आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा आहे. कालच नवं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) रिकामे आहे. यासाठी आता लवकरच नियुक्ती केली जाणार असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा आहे. कालच नवं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (Discussion of the name of Radhakrishna Vikhe Patil for the post of Assembly Speaker)

हेही वाचा – नव्या सरकारविरोधात शिवसेना कोर्टात, पण याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

२०१९ पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सत्तांतर होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा हिरमोड झाला. पक्षांतर करूनही काही फायदा न झालेल्या राधा कृष्ण विखे पाटलांना आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची सुत्रे मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – …तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

२०१९ पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मात्र, विरोधात असूनही त्यांनी कधी सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. काँग्रेसने माझी कोंडी केली, असं सांगत त्यांनी २०१९ ला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच, आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरू आहे.

हेही वाचा – शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, राऊतांची ईडी चौकशी तर पवारांना आयटीची नोटीस

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये सुरू केला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधूनच आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती. राजकीय घराण्यात जन्माल्या आल्याने त्यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले. १९८६ मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. याकाळात त्यांनी भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली होती. त्यानंतर 1994मध्ये त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली.

दरम्यान,  विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शपथविधी घेतल्यानंतर २ आणि ३ तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल असं सांगितलं होतं. दरम्यान आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.