घरमहाराष्ट्रकाँग्रेस बैठकीत उमेदवाराच्या नावावर चर्चा

काँग्रेस बैठकीत उमेदवाराच्या नावावर चर्चा

Subscribe

केंद्रीय निवड समिती अंतिम निर्णय घेणार, देगलूर पोटनिवडणूक

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवाराच्या नावावर शुक्रवारी प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल दिल्लीला केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवला असून ही समिती उमेदवाराच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे देगलूरची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून काँग्रेसने निश्चित केलेला उमेदवार रिंगणात उतरणार आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. नांदेड जिल्हा काँग्रेस समितीने पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांची यादी पाठवली आहे. आजच्या बैठकीत या यादीतील नावांवर चर्चा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -