घरमहाराष्ट्रनिकालाआधी माहिती देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना बडतर्फ करा, संजय राऊतांची मागणी

निकालाआधी माहिती देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना बडतर्फ करा, संजय राऊतांची मागणी

Subscribe

16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून निशाणा साधला आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका करत त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाकडून निकाल देण्यात आला. या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly speaker Rahul Narvekar) या प्रकरणी नेमका काय निकाल लावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून निशाणा साधला आहे. पक्षांतर करणे हा नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय असल्याचा राऊतांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका करत त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. (Dismiss Assembly Speaker who gave information before result, Sanjay Raut’s demand )

हेही वाचा – त्र्यंबक प्रकरणाऐवजी कुरुलकर प्रकरणी SIT नेमा; संजय राऊतांचे सरकारला आव्हान

- Advertisement -

राहुल नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि वैचारिक बैठकीविषयी सांगितलंच आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आणि व्यवसाय आहे,. हे स्पष्टपणे सांगतो. ते ज्या पक्षात गेले नाहीत असा एकही पक्ष उरला नाही. त्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं कारण दिसत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या आहेत. त्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत, असे मत व्यक्त करत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांचा 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेतला.

कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालंय. तुम्ही कायद्याचं राज्य मोडीत काढण्यासाठी संविधानाचा वापर करत आहात. तुम्ही ज्या मुलाखती देत आहात त्या कायद्याच्या राज्यात बसत नाहीत. न्यायालयासमोर जो खटला चालवला जातो, तेव्हा न्यायामूर्ती पत्रकार परिषदा घेत नाही. मी काय करणार हे सांगत नाही. मला काय अधिकार आहे हे सांगत नाहीत. मी हा पहिला माणूस पाहिला. पहिले कोश्यारी आणि दुसरे हे. कोणताही न्यायामूर्ती समोर येऊन सांगत नाही माझ्यासमोर हा खटला चालणार आहे. मी हा निकाल देणार आहे. मी हे करणार आहे. हे पहिले गृहस्थ आहेत. त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी करत राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर घणाघात केला.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देण्यात आला, त्यावेळी राहुल नार्वेकर हे लंडनच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून सोमवारी परतल्यानंतर नार्वेकरांनी लगेच कामकाजाला सुरूवात केली आहे. तर 16 आमदारांच्याबाबतची माहिती देणारी पत्रकार परिषद राहुल नार्वेकर यांनी काल मंगळवारी (ता. 16 मे) घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाचा बराचसा उलगडा करत माहिती दिली. ज्यामुळे राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -