परब- सोमय्या पुन्हा आमनेसामने; ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचं म्हाडा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

dispute between anil parab and kirit somaiya has escalated and they have started a sit in at mhadas office

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे. यात किरीट सोमय्यांनी अनिल परब यांचं वांद्र्याच्या म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यावर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत, सुडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. यावर येऊ देत त्या सोमय्याला…आम्ही स्वागतासाठी तयार म्हणतं अनिल परब यांनी सोमय्यांना खुलं आव्हान दिलं. या आव्हानानंतर सोमय्या त्या दिशेने जाण्यासाठी निघाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अडवलं. दरम्यान या सर्व घडामोडीत अनिल परब यांचे कार्यालय तोडल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेकडो शिवसैनिकांनी थेट म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसून सोमय्या आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आक्रमक शिवसैनिकांना रोखणं सुरक्षेवर तैनात पोलिसांनाही यंत्रणाबाहेर गेलं.

शेकडो संतप्त शिवसैनिकांनी म्हाडाच्या कार्यायलात अनिल परबांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या झालेल्या पाडकामाविरोधात निषेध व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना कार्यालयाबाहेर काढत तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर म्हाडा कार्यालयाबाहेर देखील शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी आक्रमक शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. जोपर्यंत म्हाडाचे अधिकारी उत्तर देणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी आंदोलक शिवसैनिकांनी भूमिका घेतली. त्यामुळे एकही आंदोलक शिवसैनिक म्हाडा कार्यालय परिसरातून हटण्यास तयार नव्हता. परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची आता धरपकड सुरु केली आहे. यावेळी अनेक आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अशात आता अनिल परब म्हाडा ऑफिसमध्ये पोहचून आपल्या कार्यालय पाडाकामसंदर्भात म्हाडा अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. त्यामुळे अनिल परब कार्यालयाबाहेर येऊन जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत इथून हटणारचं नाही या भूमिकेवर अद्यापही काही कार्यकर्ते ठाम आहेत.

दरम्यान पोलिसांनी आता अनिल परब यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली आहे.


मनसेच्या टार्गेटवर पुन्हा ठाकरे गट; भ्रष्टाचाराचे आरोप करत थेट ईडीला पाठवलं पत्र