घरक्राइमक्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद; नांदेडच्या घटनेत अनेक जण जखमी

क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद; नांदेडच्या घटनेत अनेक जण जखमी

Subscribe

क्षुल्लक कारणावरून नांदेडमधील किनवटमध्ये दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून वाद होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

राज्यात अचानक शांतता भंग होईल, अशा काही घटना घडत आहेत. दोन गटांत होणारा वाद, त्यानंतर होणारी तोडफोड, जाळपोळ यांमुळे राज्यातील काही भागांत सध्या तरी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. शनिवारी रात्री अकोला शहरातील हरिहरपेठ भागांत दोन गटांत वाद झाल्यानंतर त्या भागात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर असाच काहीसा प्रकार हा नगरच्या शेवगावमध्ये रविवारी रात्री घडला. म्हणजेच दोन दिवसांत दोन घटना घडल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण अगदी क्षुल्लक कारणावरून नांदेडमधील किनवटमध्ये दोन गटांत वाद झाल्याची तिसरी घटना आता समोर आली आहे. (dispute between two groups over a trivial cause; Many injured in Nanded incident) त्यामुळे क्षुल्लक कारणावरून वाद होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

हेही वाचा – “काँग्रेसने जास्त खूश होऊ नये…”, रणनितीकार प्रशांत किशोर यांनी का दिला असा सल्ला?

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात डीजेच्या आवाजावरून दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दोन गटात तेढ निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर यांच्यामध्ये हाणामारी देखील झाली, ज्यामुळे या घटनेत दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 14 मे) रात्री साडेदहा वाजता गंगानगर येथे लग्न समारंभ पूर्वी हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी हळदीमध्ये डीजेवर गाणे वाजवले होते. त्याचवेळी इस्लामपुरा येथील दहा जण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी गाणे का वाजवत आहेत, अशी विचारणा केली. ज्यानंतर त्या दोन्ही गटात बाचाबाची झाली. याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. ज्यानंतर या घटनेत कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हाताला मुका मार लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. तर या घटनेनंतर किनवट ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, अर्धापूरचे सहपोलीस अधीक्षक गोहर हसन किनवटचे उपाधीक्षक विजय डोंगरे हे घटनास्थळीच थांबून राहिले.

- Advertisement -

11 जण ताब्यात
या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एका गटातील सात जणांना तर दुसऱ्या गटातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घटना किरकोळ असून शांतता कायम आहे. अफवा पसरवून शांतता भंग करु नये अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -